मोठ्या वाहनांमुळे वाकडेवाडी भुयारी मार्गात कोंडी वाहनचालकांना त्रास ः महापालिका व वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मोठ्या वाहनांमुळे वाकडेवाडी भुयारी मार्गात कोंडी
 

वाहनचालकांना त्रास ः महापालिका व वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष
मोठ्या वाहनांमुळे वाकडेवाडी भुयारी मार्गात कोंडी वाहनचालकांना त्रास ः महापालिका व वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

मोठ्या वाहनांमुळे वाकडेवाडी भुयारी मार्गात कोंडी वाहनचालकांना त्रास ः महापालिका व वाहतूक पोलिसांचे दुर्लक्ष

sakal_logo
By

पुणे, ता. २४ ः वाकडेवाडी येथील भुयारी मार्गात मोठ्या वाहनांना मनाई असलेले फलक नाहीत. तसेच त्यांच्यावर वाहतूक पोलिसांकडून कारवाई केली जात नाही. तसेच महापालिका प्रशासन व वाहतूक पोलिसांचे याकडे दुर्लक्ष होत आहे.
त्यामुळे स्थानिक नागरिक व वाहनचालकांसह स्थानिक नागरिकांना दररोज वाहतूक कोंडीची समस्या जाणवत आहे.

वाकडेवाडी येथील जुन्या मुंबई-पुणे महामार्गावर ग. दी. माडगुळकर भुयारी मार्ग असून येथून मोठ्या प्रमाणात वाहनांची ये-जा होत असते. मात्र, भुयारी मार्गामध्ये प्रवेश करण्यापूर्वी मोठ्या वाहनांना प्रवेशास बंदी असणाऱ्या फलकांचा अभाव आहे. तसेच संबंधित ठिकाणी वाहतूक पोलिसांकडूनही दुर्लक्ष केले जाते. त्यामुळे भुयारी मार्गातून दररोज टेम्पो व अन्य मोठी वाहने जातात. मात्र, भुयारी मार्गाच्या उंचीचा अंदाज न आल्यामुळे ही वाहने तेथे अडकून पडतात. परिणामी त्यांच्यापाठीमागे तसेच संबंधित वाहने तेथून बाहेर काढताना समोरून येणाऱ्या वाहनांच्याही दूरपर्यंत रांगा लागून वाहतूक कोंडी होते. दरम्यान, भुयारी मार्गाच्या चारही बाजूला उंची दर्शक कमान बसवावी, मोठ्या वाहनांवर कारवाई करावी, भुयारी मार्गातील खड्डे बुजवून गटारांची उघडी झाकणे त्वरित बदलण्यात यावीत, अशी मागणी स्थानिक नागरीकांनी केली आहे.

भुयारी मार्गात दररोज तीन-चार टेम्पो अडकतात. त्यामुळे वाहतूक कोंडी होते. हा प्रकार थांबविण्यासाठी भुयारी मार्गाभोवती उंची दर्शक कमानी बसवून, खड्डे बुजविणे, गटारांची झाकणे बंद करणे यासारख्या उपाययोजना केल्या पाहिजेत.
- सुमित्र माडगुळकर, रहिवासी, वाकडेवाडी.

भुयारी मार्गातून फक्त दुचाकी व चारचाकी वाहनांनाच प्रवेश आहे. मात्र, छोटे टेम्पो जाण्याने वाहतूक कोंडी होत असल्यास संबंधित वाहनांवर तत्काळ कारवाई केली जाईल.
- प्रकाश माशाळकर, पोलिस निरीक्षक, खडकी वाहतूक

भुयारी मार्गामधून जाणाऱ्या वाहनांवर कारवाई करण्याचे काम वाहतूक पोलिसांचे आहे. तरीही भुयारी मार्गातून मोठी वाहने जात असल्यास तेथे उंची दर्शक फलक लावून आवश्‍यक उपाययोजना केल्या जातील.
- श्रीनिवास बोनाला, प्रकल्प प्रमुख, पुणे महापालिका


फोटो नं - 32424,32425