Thur, June 8, 2023

जलतरण तलाव सुरू करण्याची मागणी
जलतरण तलाव सुरू करण्याची मागणी
Published on : 24 March 2023, 11:58 am
पिंपरी, ता.२४ ः निगडी प्राधिकरण येथील महापालिकेचा छत्रपती शिवाजी महाराज जलतरण तलाव सुरू करण्याची मागणी माजी नगरसेविका शर्मिला बाबर यांच्यासह परिसरातील नागरिकांनी आयुक्त शेखर सिंह यांच्याकडे केली आहे. त्यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे, ‘शाळा-महाविद्यालयांच्या उन्हाळी सुटी सुरू होण्यास सुरूवात झाली, असली तरी अद्यापही हा तलाव बंद आहे. त्यामुळे परिसरातील खेळाडू, विद्यार्थी, ज्येष्ठ व नागरिकांची गैरसोय होती. सर्वांना इतर ठिकाणाच्या तलावाचा आधार घ्यावा लागतो. याची दखल घेवुन लवकरात लवकर तलाव सुरू करावा.’