‘रहाटणी, पिंपळे सौदागरमधील पाणीपुरवठा सुरळीत करा ः काटे | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘रहाटणी, पिंपळे सौदागरमधील
पाणीपुरवठा सुरळीत करा ः काटे
‘रहाटणी, पिंपळे सौदागरमधील पाणीपुरवठा सुरळीत करा ः काटे

‘रहाटणी, पिंपळे सौदागरमधील पाणीपुरवठा सुरळीत करा ः काटे

sakal_logo
By

पिंपरी, ता. २४ ः रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरात गेल्या कित्येक दिवसांपासून दिवसाआड, कमी दाबाने व अपुरा पाणीपुरवठा होत आहे. त्यामुळे नागरिकांना पाणी समस्येला सामोरे जावे लागत आहे. याकडे त्वरित लक्ष देऊन पाणी समस्या सोडवावी अन्यथा महापालिकेवर हंडा मोर्चा काढू, असा इशारा माजी विरोधी पक्षनेते नाना काटे यांनी प्रशासक शेखर सिंह यांना दिला आहे. काटे यांनी सिंह यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, रहाटणी, पिंपळे सौदागर परिसरात सोसायट्यांची संख्या जास्त आहे. पाण्यासाठी खाजगी टॅंकर मागवावे लागत आहेत. आर्थिक भुर्दंड बसत आहे. लाखो रुपये कर भरूनही पाणी पुरेशा प्रमाणात मिळत नसल्याने नागरिकांचा रोष वाढतो आहे. संबंधित विभागाचे अधिकारी व कर्मचारी उडवाउडवीची उत्तरे देतात. पिंपळे सौदागर येथील राजमाता जिजाऊ उद्यानात एक वर्षापासून पाण्याची टाकी बांधून तयार आहे. त्यावरून अद्याप पाणीपुरवठा सुरू केलेला नाही. सध्या उन्हाळा सुरू असल्याने पाण्यासाठी नागरिक त्रस्त झाले आहेत. याकडे त्वरित लक्ष देऊन पाणी समस्या लवकरात लवकर सोडवावी अन्यथा महापालिकेवर हंडा मोर्चा काढू.