बेशिस्त चालकांना दंडाची धास्ती ठिकठिकाणी नाकाबंदी ः आॅनलाईन दंडाची होतेय वसुली

बेशिस्त चालकांना दंडाची धास्ती 
ठिकठिकाणी नाकाबंदी ः आॅनलाईन दंडाची होतेय वसुली

पिंपरी, ता. २४ : बेशिस्त वाहन चालक वाहतूक नियमांचे उल्लंघन करून सुसाट गाडी नेतात. मात्र, अशा बेशिस्त वाहन चालकांवर पोलिसांकडून बारीक नजर ठेवली जात असून, सीसीटीव्हीद्वारे ऑनलाइन दंड आकारला जात असतो. दरम्यान, काहीजण हा दंड भरण्यास टाळाटाळ करीत असल्याने वाहतूक पोलिसांनी नाकाबंदी करून हा थकीत दंड वसूल करण्यास सुरवात केली आहे. थकीत दंड एकदम भरावा लागत असल्याने चालकांनी कारवाईची चांगलीच धास्ती घेतली आहे.

ठिकठिकाणी नाकाबंदी केली जात असून, वाहनांवरील दंडाची तपासणी केली जात आहे. या अंतर्गत मागील काही दिवसांत विविध वाहतूक विभागांतर्गत मोठ्या प्रमाणात दंड वसुली झाली आहे. १ जानेवारी ते २२ मार्च या कालावधीत ६६ हजार ७३२ वाहनांवर कारवाई करून, चार कोटी १३ लाख ४६ हजार २५० दंड वसूल केला आहे. ही कारवाई यापुढेही सुरु राहणार आहे.
दरम्यान, आपल्या वाहनांवर प्रलंबित दंड असल्यास वाहतूक नियंत्रण शाखेत अथवा ट्रॅफिक पॉइंटवर असलेल्या अंमलदारांकडे तत्काळ भरावा. लवकर दंड न भरल्यास रक्कम वाढत जाते. तसेच न्यायालयीन प्रक्रियेलाही सामोरे जावे लागणार आहे.
----------------------

मार्चमधील अनपेड दंड वसुली

वाहतूक विभाग केस दंड

बावधन ३२८ ३ लाख २३ हजार ३००
भोसरी ६५९ ५ लाख ५७हजार १००
चाकण ४६६ ३ लाख ३४ हजार २००
चिंचवड ३१३ २ लाख २४ हजार ५०
देहूरोड ७१९ ५ लाख ८१ हजार १००
दिघी-आळंदी ५७० ३ लाख ८४ हजार ४००
हिंजवडी ४६७ ३ लाख ८५ हजार ३५०
म्हाळुंगे ८४१ ६ लाख ६४ हजार २००
निगडी ५४९ ३ लाख ९५ हजार २००
पिंपरी ४८९ ३ लाख ५ हजार ७५०
सांगवी ९२५ ६ लाख १८ हजार ५००
तळेगाव ६४७ ५ लाख १ हजार १५०
तळवडे ५५८ ३ लाख ९६ हजार ८५०
वाकड ५२९ ४ लाख १५ हजार ७००
---------------------------
२० हजार पेक्षा अधिक दंड थकीत असलेले - १ हजार ५९
१० ते २० हजार या दरम्यानचा दंड थकीत असलेले - ७ हजार २००
--------------------

वाहतूक नियमांचे उल्लंघन केल्याने दंड झालेल्या वाहनचालकांनी तत्काळ थकीत दंड भरावा. अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे लागेल. २० हजार पेक्षा अधिक दंड थकीत असलेल्या चालकांना नोटीस
बजावली जाईल. तरीही दंड न भरल्यास न्यायालयात खटला दाखल केला जाणार आहे.
- दीपक साळुंखे, वरिष्ठ पोलिस निरीक्षक, नियोजन विभाग, वाहतूक शाखा.
-------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com