Sun, June 4, 2023

चिंचवडमध्ये वर्कशॉपला आग
चिंचवडमध्ये वर्कशॉपला आग
Published on : 24 March 2023, 3:17 am
चिंचवडमध्ये
वर्कशॉपला आग
पिंपरी, ता. २४ : चिंचवडमधील चिंचवडेनगर येथील एका वर्कशॉपला शुक्रवारी (ता. २४) सायंकाळी मोठी आग लागली आहे. यामध्ये वर्कशॉपसह एका मोटारीचे नुकसान झाले. चिंतामणी चौक येथे हे वर्कशॉप असून येथे अचानक आग लागली. घटनेची माहिती मिळताच पिंपरी-चिंचवड महापालिकेच्या पिंपरीतील मुख्य अग्निशमन केंद्रासह प्राधिकरण व थेरगाव या उपकेंद्राच्या तीन गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. काही वेळातच आगीवर नियंत्रण मिळविण्यात यश आले. दरम्यान, या घटनेत वर्कशॉपसह मोटारीचे नुकसान झाले. ही आग नेमकी कशामुळे लागली हे स्पष्ट झालेले नाही. धुराचे लोट दूर अंतरापर्यंत पसरल्याने नागरिकांनी मोठ्याप्रमाणात गर्दी केली होती.