देहू संस्थनच्या अध्यक्षांच्या घरी चोरी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

देहू संस्थनच्या अध्यक्षांच्या घरी चोरी
देहू संस्थनच्या अध्यक्षांच्या घरी चोरी

देहू संस्थनच्या अध्यक्षांच्या घरी चोरी

sakal_logo
By

देहू संस्थानच्या
अध्यक्षांच्या घरी चोरी
पिंपरी, ता. २४ : देहूतील श्री संत तुकाराम महाराज संस्थानचे अध्यक्ष नितीन महाराज मोरे यांच्या घरी भरदिवसा चोरी झाली. या घटनेत २२ तोळे सोन्याचे दागिने चोरीला गेले आहेत. नितीन महाराज मोरे (रा. छत्रपती शिवाजी महाराज चौक, देहूगाव, ता. हवेली) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार देहूरोड पोलिस ठाण्यात अनोळखी व्यक्तीवर गुन्हा दाखल झाला आहे. दुपारी चारच्या सुमारास आरोपी घरात शिरला. कपाटातील २२ तोळ्यांचे दागिने लंपास केले. या प्रकरणी देहूरोड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाल्यानंतर पोलिसांनी परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांची तपासणी केली. यामध्ये आरोपीच्या हालचाली दिसत असून, त्यादृष्टीने तपास सुरू आहे. यासह परिसरात चौकशी केली जात आहे. देहूरोड पोलिस अधिक तपास करीत आहेत.