आरोपीने पोलिसांच्या हाताला घेतला चावा

आरोपीने पोलिसांच्या हाताला घेतला चावा

पिंपरी : पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपीला चौकशीसाठी पोलिस ठाण्यात चल, असे म्हणाले असता आरोपीने त्यास नकार देत पळून जाऊ लागला. पोलिसांनी त्याला पकडण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने पोलिसांच्या हाताला चावा घेत शासकीय कामात अडथळा निर्माण केला. हा प्रकार पिंपळे सौदागर येथे घडला. खंडू जालिंदर लोंढे (वय २३, रा. रहाटणी) असे आरोपीचे नाव आहे. याप्रकरणी पोलिस हवालदार संतोष मारुती बर्गे (वय ४४) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी व त्यांचे सहकारी पोलिस शिपाई खेडकर हे पिंपळे सौदागर, कोकणे चौक परिसरात गस्त घालत होते. दरम्यान, वाकड पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या गुन्ह्यातील फरार आरोपी लोंढे हा चौकात दिसला. त्याला दाखल गुन्ह्याच्या चौकशीसाठी पोलिस ठाण्यात सोबत चल, असे म्हणाले असता त्याने नकार देत पळून जाऊ लागला असता फिर्यादीसह त्यांच्या सहकाऱ्याने त्यास पकडण्याचा प्रयत्न केला. त्यावेळी आरोपीने दोघांना हाताने मारहाण करीत फिर्यादी यांच्या हातावर नखाने ओरखडले. तसेच त्यांच्या हाताला चावा घेत शासकीय कामात अडथळा निर्माण केला.

चिखलीत महिलेची ३८ लाखांची फसवणूक
नोकरीच्या कामासह उपचारासाठी पैशांची आवश्यकता असल्याची खोटी कारणे सांगत महिलेकडून पैसे उकळून ३८ लाखांची फसवणूक केली. हा प्रकार चिखली येथे घडला. याप्रकरणी चिखली, शरदनगर येथील ४५ वर्षीय महिलेने फिर्याद दिली आहे. त्यानुसार समीर शाहीर पटेल याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. व्हाट्सअपद्वारे ओळख झाल्यानंतर आरोपीने फिर्यादीचा विश्वास संपादन करून मैत्री केली. त्याच्या नोकरीच्या कारणासाठी व नोकरीनिमित्त दिल्लीला जाण्यासाठी तसेच त्याला झालेल्या एका आजाराच्या व अपघाताच्या उपचारासाठी, प्रवास खर्चासाठी, अशी खोटी कारणे सांगून फिर्यादी यांना पैसे ट्रान्सफर करायला लावले. असे वेळोवेळी ३८ लाख ४८ हजार ६०९ रुपये उकळले. नंतर हे पैसे परत न देता पैसे मागितले तर घरातील सर्वांना जिवे मारण्याची धमकी दिली. पैसे परत न करता फिर्यादीची फसवणूक केली.

मोटारीची काच फोडून लॅपटॉप लंपास
मोटारीची काच फोडून मोटारीतील लॅपटॉप लंपास केल्याची घटना भोसरी येथे घडली. स्वप्नील बबन ढेरे (रा. मोशी-आळंदी रोड, डुडुळगाव) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात आरोपीवर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांनी त्यांची मोटार भोसरीतील जय गणेश साम्राज्य चौक येथे उभी केली होती. दरम्यान, आरोपीने मोटारीच्या डाव्या बाजूची काच फोडून एक लॅपटॉप, एक घड्याळ व लॅपटॉप चार्जर लंपास केला.

महिलेवर अत्याचार करून आर्थिक फसवणूक
लग्नाचे आमिष दाखवून महिलेवर अत्याचार केला. तसेच पैसे उकळून आर्थिक फसवणूक करीत एकजण पसार झाल्याप्रकरणी एकावर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार बावधनसह इतर ठिकाणी घडला. विजयसिंग सुजनसिंग तंवर (रा. उत्तमनगर, बावधन, मूळ - राजस्थान) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. आरोपीने फिर्यादीला लग्नाचे आमिष दाखवून त्यांच्याशी वेळोवेळी शारीरिक संबंध केले. तसेच फिर्यादीचा विश्वास संपादन करून घेतलेले पैसे परत देतो, असे सांगून त्यांच्याकडून साडे बारा लाख रुपये रोख व चार लाख ७७ हजार ६३० रुपये ऑनलाइन स्वरूपात घेतले. त्यानंतर फिर्यादीची फसवणूक करून आरोपी पसार झाला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com