साथीच्या आजारांची 
अशी घ्या काळजी 
डॉक्टरांचा सल्ला; वातावरणातील बदलाचा परिणाम
स्वतःच काळजी घ्या

साथीच्या आजारांची अशी घ्या काळजी डॉक्टरांचा सल्ला; वातावरणातील बदलाचा परिणाम स्वतःच काळजी घ्या

पिंपरी, ता. २६ ः कधी थंडी, कधी पाऊस तर कधी कडक ऊन असे बदलते हवामान सध्या आहे. अशा वातावरणात वेगवेगळे व्हेरिएंट तयार होतात. त्यामुळे स्वाइन फ्लू, एच३एन२, कोरोना यांसारखे साथीचे आजार वारंवार येत असतात. यासाठी विषाणूच्या संसर्गामुळे घाबरून न जाता स्वतःच स्वतःची काळजी घेणे आणि डॉक्टरांच्या सल्ल्याने औषध व प्रतिबंधक लस घेणे आवश्यक असल्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला.
जानेवारीपासून सात मार्चपर्यंत एच३एन२चे सात रुग्ण शहरात आढळले आहेत. गेल्या वीस दिवसांत एकही रुग्ण नाही. मात्र, सर्दी, खोकला, ताप, घसादुखी असे रुग्ण आहेत. त्यांची एच३एन२, कोरोना संसर्गाबाबत तपासणी व औषधोपचार केले आहेत. गेल्या दहा दिवसांत दोन हजार ९८६ संशयितांची तपासणी केली. दिवसाला सरासरी तीनशे रुग्णांचा समावेश आहे. या पार्श्वभूमीवर डॉक्टरांना विचारले असता, हा हवामानातील बदलाचा परिणाम असल्याचे त्यांनी सांगितले.

काय करावे
- विषाणू प्रतिबंधक लस घेऊन प्रतिकारशक्ती वाढवावी
- सर्दी-खोकला असल्यास रुमाल बाळगणे
- मास्क वापरावा, विश्रांती घ्यावी

काय करू नये
- बाधित रुग्णांच्या संपर्कात येऊ नये
- रुग्णांनी सार्वजनिक ठिकाणी जाऊ नये
- डॉक्टरांच्या सल्ल्याशिवाय औषध घेऊ नये

अधिक धोका
- ज्येष्ठ नागरिक
- श्वसनाचा त्रास असलेले
- ह्रदयविकाराचे रुग्ण

कोविडबाबत नवीन मार्गदर्शक सूचना नाहीत. पण, आजाराची फार लक्षणेही नाहीत. पण, मास्क वापरणे, सोशल डिस्टंसिंग पाळणे, हात धुणे अशा सूचनांचे पालन करायला हवे. सरकारकडून सूचना नसल्या आणि प्रतिबंधक लस घेतल्यामुळे प्रतिकारशक्ती वाढलेली असली तरी प्रत्येकाने आपापली काळजी घेणे गरजेचे आहे.
- डॉ. मनोज रांका, सदस्य, कोविड टास्क फोर्स, आयूष मंत्रालय

व्हायरल इन्फेक्शनवर ठोस असा उपाय नसतो. रुग्णांना प्रतिबंधतात्मक औषधे द्यावी लागतात. त्यांची प्रतिकारशक्ती वाढणे आवश्यक आहे. विषाणूजन्य आजार नियंत्रित ठेवण्यासाठी ॲंटिडोस महत्त्वाचे ठरतात. त्यामुळे लक्षणे कुठलीही असली तरी विषाणूजन्य आजार रोखण्यासाठी काळजी घेणे हाच एक उपाय ठरतो.
- डॉ. श्रीकृष्ण जोशी, वैद्यकीय संचालक, लोकमान्य हॉस्पिटल

विषाणूंच्या संसर्गामुळे घाबरून जाऊ नये. सर्दी, खोकला, घसादुखी, ताप इत्यादी लक्षणे असल्यास त्वरित महापालिकेच्या दवाखाना वा रुग्णालयातील वैद्यकीय अधिकाऱ्यांचा सल्ला घ्यावा. त्यावर औषधोपचार सर्व रुग्णालयांत उपलब्ध आहेत. आवश्यकता भासल्यास मास्कचा वापर करावा. गर्दीच्या ठिकाणी जाणे टाळावे.
- डॉ. लक्ष्मण गोफणे, आरोग्य वैद्यकीय अधिकारी, महापालिका
--

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com