पवनमावळातील नऊ शाळा
ठरल्या ‘शंभर नंबरी’

पवनमावळातील नऊ शाळा ठरल्या ‘शंभर नंबरी’

सोमाटणे, ता. ३ ः पवन मावळातील एकोणीसपैकी नऊ मराठी माध्यमांच्या शाळांची वाटचाल शंभर टक्के निकालाकडे झाली असून, शिक्षकांच्या मेहनतीला यश आले.
त्यातच पवन मावळातील मराठी माध्यमांच्या शाळात फारशा शैक्षणिक सुविधा नसतानाही दुर्गम भागातील विद्यार्थी अभ्यासू बनवण्याचे आव्हान शिक्षकांनी स्वीकारले होते. वेळेचे कोणतेही बंधन न ठेवता अधिक वेळ केवळ विद्यार्थ्यांच्या अभ्यासासाठी सरावासाठी व प्रबोधनासाठी शिक्षकांनी दिला. याचा परिणाम पवन मावळातील एकोणीसपैकी नऊ शाळांनी शंभर टक्के निकाल लावण्यात शिक्षकांनी यश मिळवले. पवन मावळातील छत्रपती शिवाजी विद्यालय शिवली, भैरवनाथ माध्यमिक विद्यालय बऊर, बी. एन. राजहंस विद्यालय परंदवडी, ज्योतिबा विद्यालय बेबडओहोळ, संत तुकाराम विद्यालय शिवणे, कर्मवीर विद्यालय आढले, पंचक्रोशी विद्यालय दारुंब्रे, तुंग माध्यमिक विद्यालय तुंग, भैरवनाथ माध्यमिक विद्यालय, करुंज या माध्यमिक विद्यालयाचा निकाल शंभर टक्के लागला. याबाबत शिवली येथील छत्रपती शिवाजी विद्यालयाचे मुख्याध्यापक दत्तात्रेय जाधव म्हणाले, ‘‘कोरोना काळात विद्यार्थी अभ्यासापासून दुरावलेले होते. त्यांना परत जागेवर आणण्यासाठी शिक्षकांनी अभ्यासाबरोबर नियमित प्रबोधन केले. त्यामुळे शंभर टक्के निकालाची परंपरा राखता आली.’’
--------------------------------------------------------------------------------------

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com