लक्ष्मीनगर पतसंस्थेकडून
विविध पुरस्कारांचे वितरण

लक्ष्मीनगर पतसंस्थेकडून विविध पुरस्कारांचे वितरण

पिंपरी, ता. ४ ः वाल्हेकरवाडी येथील लक्ष्मीनगर नागरी सहकारी पतसंस्थेच्या विसाव्या वर्धापन दिनानिमित्त सहकार भूषण, आदर्श शिक्षक, आदर्श माता या पुरस्कारांचे वितरण करण्यात आले. यानिमित्त बाबूराव वाल्हेकर यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. अंजना राजेंद्र ब्राह्मणकर व गोविंद जगदाळे यांना ‘आदर्श शिक्षक’ म्हणून सन्मानित करण्यात आले.
आमदार अण्णासाहेब बनसोडे यांच्या हस्ते दीप प्रज्वलन करून, या कार्यक्रमाची सुरवात झाली. आमदार बनसोडे यांच्या हस्ते पुणे जिल्हा सहकारी बोर्डाचे अध्यक्ष हिरामण अण्णा सातकर यांना ‘सहकार भूषण पुरस्कार’, ज्येष्ठ सभासद कोंडिबामहाराज मारुती शिवले यांना ‘समाजभूषण’ पुरस्कार देऊन गौरविण्यात आले. मंगल पराड व राणूबाई काशिनाथ भोंडवे यांना ‘आदर्श माता’ म्हणून गौरविले. यावेळी प्रेरणा को-ऑपरेटिव्ह बँकेचे संस्थापक तुकाराम गुजर, चेअरमन कांतिलाल गुजर, माजी नगरसेवक संदीप चिंचवडे, माजी विरोधी पक्षनेते संतोष बारणे, ज्येष्ठ नगरसेवक भाऊसाहेब भोईर, नगरसेविका अश्विनी चिंचवडे, माजी विरोधी पक्षनेते नाना काटे, राष्ट्रवादी काँग्रेस सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष संजय औसरमल, माजी नगरसेवक सुजित पाटील व सर्व संचालक मंडळ व सभासद खातेदार मोठ्या संख्येने उपस्थित होते. तसेच संस्थेने तीस कोटी व्यवसायाचा टप्पा पूर्ण केल्याबद्दल व स्थापनेपासून अ वर्ग राखल्याबद्दल आमदार बनसोडे यांनी समाधान व्यक्त केले. संस्थेचे संस्थापक अध्यक्ष श्रीधर वाल्हेकर यांनी प्रास्ताविक केले. संचालक सचिन श्रीधर वाल्हेकर यांनी सूत्रसंचालन केले. नाना शिवले यांनी आभार मानले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com