सराईत आरोपीकडून पिस्तूल जप्त | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सराईत आरोपीकडून पिस्तूल जप्त
सराईत आरोपीकडून पिस्तूल जप्त

सराईत आरोपीकडून पिस्तूल जप्त

sakal_logo
By

सराईत आरोपीकडून
पिस्तूल जप्त

पिंपरी, ता. ३ : खून प्रकरणातील गुन्ह्यात जामीनावर बाहेर आलेल्या आरोपीकडून एक पिस्तूल व दोन जिवंत काडतुसे जप्त केली. पिंपरी-चिंचवड पोलिसांच्या गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाने ही कारवाई केली.
उमेश चंद्रकांत केदारी (वय २७, रा. कोयतेवस्ती, पुनावळे) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अवैध शस्त्रे विक्री करणारे व अवैध शस्त्रे बाळगणाऱ्यांचा शोध घेऊन त्यांना अटक करण्याचे आदेश पोलिस आयुक्त विनय कुमार चौबे यांनी दिले आहेत. या पार्श्‍वभूमीवर पिंपरी चिंचवड पोलिस आयुक्तालयातील गुन्हे शाखेच्या गुंडा विरोधी पथकाचे पोलिस अधिकारी व कर्मचारी हे शुक्रवारी (ता. २) पुनावळे परिसरात गस्त घालत होते. त्यावेळी उमेश केदारी हा कोयतेवस्ती येथे अवैध शस्त्र घेऊन येणार असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, गुंडा विरोधी पथकाच्या पोलिसांनी त्याला ताब्यात घेतले. त्याच्या ताब्यातून ५१ हजार रुपये किंमतीचे एक गावठी पिस्तूल मॅग्झीनसह व दोन जिवंत काडतुसे पोलिसांनी हस्तगत केली. याप्रकरणी आरोपीच्या विरोधात रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली. न्यायालयाने त्याला ५ जूनपर्यंत पोलिस कोठडी सुनावली. आरोपी उमेश केदारी याच्या विरोधात कामशेत पोलिस ठाण्यात खुनाचा गुन्हा दाखल आहे. या गुन्ह्यात सध्या तो जामीनावर बाहेर आला होता.