Fri, Sept 22, 2023

चिंचवडमध्ये वृक्षारोपणाची तपपूर्ती
चिंचवडमध्ये वृक्षारोपणाची तपपूर्ती
Published on : 5 June 2023, 11:25 am
पिंपरी, ता. ५ ः चिंचवड येथील गोलांडे इस्टेट मित्रपरिवार आणि आनंद ज्येष्ठ नागरिक संघ यांनी जागतिक पर्यावरण दिन आणि वटपौर्णिमेचे औचित्य साधून वडाचे रोप लावून वृक्षारोपणाची तपपूर्ती साधली. गोलांडे इस्टेट परिसरात कार्यक्रम झाला. सेवानिवृत्त नगररचना उपसंचालक प्रभाकर नाळे, गोलांडे इस्टेट मित्रपरिवारचे अध्यक्ष राजाभाऊ गोलांडे, अशोक नागणे, सरिता कुलकर्णी, स्मिता ब्रह्मे आदी उपस्थित होते. गेल्या बारा वर्षांपासून परिसरातील वृक्षांची नित्यनेमाने निगा राखणारे ज्येष्ठ वृक्षप्रेमी सखाराम पाटील यांचा कृतज्ञतापूर्वक सत्कार केला. आनंद ज्येष्ठ नागरिक संघाचे संस्थापक अध्यक्ष ज्ञानेश्वर खेडकर यांनी सूत्रसंचालन केले. रवींद्र झेंडे यांनी आभार मानले.