अमेरिकेतील गीता दिघे यांच्या ‘ऋतू अंतरीचा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन ‘ऋतू अंतरीचा’ काव्यसंग्रहाचे थेरगाव येथे प्रकाशन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अमेरिकेतील गीता दिघे यांच्या
‘ऋतू अंतरीचा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन

‘ऋतू अंतरीचा’ काव्यसंग्रहाचे 
थेरगाव येथे प्रकाशन
अमेरिकेतील गीता दिघे यांच्या ‘ऋतू अंतरीचा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन ‘ऋतू अंतरीचा’ काव्यसंग्रहाचे थेरगाव येथे प्रकाशन

अमेरिकेतील गीता दिघे यांच्या ‘ऋतू अंतरीचा’ काव्यसंग्रहाचे प्रकाशन ‘ऋतू अंतरीचा’ काव्यसंग्रहाचे थेरगाव येथे प्रकाशन

sakal_logo
By

पिंपरी, ता. ५ ः ‘‘एक भारतीय, एक मराठी व्यक्ती म्हणून माझे अस्तित्व जपण्याचा प्रयत्न करत आहे. विदेशात असले तरी मराठीवरील प्रेम कायम राहील. कारण, तिच्यामुळेच मी माझ्या जीवनाचा पाया रचू शकले.’’ हे शब्द आहेत अमेरिकेत स्थायिक थेरगाव येथील गीता दिघे-बर्गे यांचे. त्यांच्या ‘ऋतू अंतरीचा’ कवितासंग्रहाच्या प्रकाशनानिमित्त त्यांनी मनोगत व्यक्त केले.
खासदार श्रीरंग बारणे यांच्याहस्ते थेरगाव येथे कवितासंग्रहाचे प्रकाशन झाले. दिघे यांच्या मातोश्री लक्ष्मी दिघे, वडील नारायण दिघे, सासू विजया बर्गे, सासरे सुभाष बर्गे, महापालिका शिक्षण मंडळाचे माजी उपसभापती नाना शिवले, उद्योजक महेश बारणे, प्रकाशक नितीन हिरवे आदी उपस्थित होते. नोकरीनिमित्त २०१५ पासून दिघे अमेरिकेत स्थायिक आहेत. थेरगाव येथील प्रेरणा माध्यमिक विद्यालयाच्या त्या माजी विद्यार्थिनी असून शालेय जीवनापासूनच कवितांचा छंद त्यांनी जोपासला आहे. पती आयटी अभियंता, मुलगा व मुलगी इंग्रजी शाळेत असले तरी घरी आम्ही मराठीत बोलतो, असे सांगून त्या म्हणाल्या, ‘‘आई-वडिलांमुळे संत तुकाराम महाराज यांची अभंगगाथा, संत ज्ञानेश्वर महाराज यांची ‘ज्ञानेश्वरी’ यांसह अनेक धर्म ग्रंथांचे विचार व संस्कार मिळाले. त्यामुळेच मी मराठीत लिहू शकले.’’ संदीप दिघे यांनी प्रास्ताविक केले. पांडुरंग दिघे यांनी सूत्रसंचालन केले. रोहित बर्गे यांनी आभार मानले.