पर्यावरण दिनानिमित्त भोसरीत वृक्षारोपण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पर्यावरण दिनानिमित्त 
भोसरीत वृक्षारोपण
पर्यावरण दिनानिमित्त भोसरीत वृक्षारोपण

पर्यावरण दिनानिमित्त भोसरीत वृक्षारोपण

sakal_logo
By

पिंपरी, ता. ५ ः नारायण हट इंग्लिश मीडियम स्कूल, लायन्स क्लब ऑफ पुणे भोजापूर गोल्ड आणि दै. ‘सकाळ’च्यावतीने जागतिक पर्यावरण दिनानिमित्त शाळेच्या मैदानात वृक्षारोपण करण्यात आले. झाडांचे काळजीपूर्वक संगोपन केले जाईल, अशी ग्वाही संस्थाचालकांनी दिली.
‘पर्यावरण संवर्धन’ या विषयावर प्रा. दिगंबर ढोकले यांनी पर्यावरणविषयक संतांचे विचार सांगून, पर्यावरणाचे रक्षण करण्याची आपली सर्वांची जबाबदारी असल्याचे सांगितले. डॉ. रोहिदास आल्हाट यांनी जलप्रदूषण वाचवण्याचे आवाहन केले तर डॉ. अनु गायकवाड यांनी जमिनीची धूप थांबविण्यासाठी झाडे लावून त्याच्या संरक्षणाचे महत्त्व सांगितले. शिवराज लांडगे यांनी वृक्षारोपणासाठी रोपे पुरविली. नारायण हट संस्थेचे अध्यक्ष संदीप बेहरे यांनी वृक्षारोपणासाठी जागा उपलब्ध करून देऊन, खड्‌डे घेऊन सहकार्य केले. संस्थेचे सभासद अंकुश गोरडे यांनी प्रास्ताविक केले.
‘मसाप’च्या भोसरी शाखेचे अध्यक्ष मुरलीधर साठे, लायन्स क्लबचे झोन अध्यक्ष सुदाम भोरे, मुकुंद आवटे, शंकर गायकवाड, तृप्ती शर्मा, मुख्याध्यापिका विजया चौगुले, साहेबराव गावडे, शिवराम काळे, रोहिदास गैंद, मीनल पाटील, प्रतिभा तांबे, प्रवीण कड, लीलाबाई परिहार यांनी सहकार्य केले. ‘सकाळ’च्या विविध उपक्रमाविषयी माहिती संदीप वाघ यांनी दिली. कार्यक्रमाची संयोजन परशुराम सैद आणि दीपक महाडीक यांनी केले.
सायली संत यांनी सूत्रसंचालन केले. लायन्स क्लब ऑफ भोजापूर गोल्डच्या अध्यक्षा जयश्री साठे यांनी आभार मानले.

फोटो ः 47434