Thur, Sept 28, 2023

ज्येष्ठांना आजपासून
नाकावाटे ‘इन्कोव्हॅक’
ज्येष्ठांना आजपासून नाकावाटे ‘इन्कोव्हॅक’
Published on : 5 June 2023, 2:55 am
पिंपरी, ता. ५ ः कोरोना प्रतिबंधक लसीकरणासाठी महापालिकेकडे इन्कोव्हॅक लस उपलब्ध झाली आहे. शहरातील आठ केंद्रांवर ती उपलब्ध असून ६० वर्षांवरील व्यक्तींना प्रिकॉशन (बुस्टर) डोस मंगळवारपासून (ता. ६) सोमवारपर्यंत (ता. १२) दिला जाणार आहे. कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन लशीचा दुसरा डोस घेऊन सहा महिने किंवा ६० आठवडे झालेल्या व्यक्तींना लसीकरण केंद्रावरच नोंदणी करून नाकावाटे डोस दिला जाईल. कुटे हॉस्पिटल आकुर्डी, जुने तालेरा रुग्णालय चिंचवड, नवीन थेरगाव, नवीन भोसरी, यमुनानगर, नवीन जिजामाता रुग्णालय पिंपरी, होळकर शाळा जुनी सांगवी, वायसीएम रुग्णालय खोली क्रमांक ६२ येथे सकाळी साडेनऊ ते दुपारी साडेचार या कालावधीत लसीकरण होईल. या केंद्रांवर प्रत्येकी २० डोस उपलब्ध आहेत, अशी माहिती आरोग्य वैद्यकीय अधिकारी डॉ. लक्ष्मण गोफणे यांनी दिली.