विद्यार्थ्याने बनविली कागदापासून सायकल | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

विद्यार्थ्याने बनविली कागदापासून सायकल
विद्यार्थ्याने बनविली कागदापासून सायकल

विद्यार्थ्याने बनविली कागदापासून सायकल

sakal_logo
By

पिंपरी, ता. ६ : पर्यावरणपूरक वस्तूंची निर्मितीचा आपला आवडता छंद जोपासण्यासाठी बारा वर्षीय यशराज रामेश्वर पवार याने कागदापासून पर्यावरणपूरक सायकल बनवली आहे. प्रदर्शनात मांडावी अशी एक लहान सायकल यशराजने बनवली आहे. यानिमित्ताने त्याने इंधनाची बचत होण्यासाठी सायकलींचे महत्त्व सांगितले आहे.
वाल्हेकरवाडी येथील यशराज हा निगडीमधील ज्ञान प्रबोधनी नवनगर या शाळेत सातवीत शिकत आहे. क्राफ्ट पेपर, वर्तमानपत्रेपासून वेगवेगळ्या वस्तू बनवण्याचा छंद असणारा यशराज याने कोरोना काळात जोपासला आहे. यशराज याला त्याच्या वाढदिवसाला त्याचे घरचे सायकल भेट देणार म्हणून तो खूष होता. परंतु त्याला सायकल दिनासाठी तुझा छंद म्हणजे ‘क्राफ्ट’ पेपर किंवा वर्तमानपत्रापासून सायकल तयार कर, असे त्याच्या आई-वडिलांनी सांगितले. कारण त्याने इयत्ता सहावीमध्ये मराठी विषयात ‘सायकलचे मनोगत’ हा पाठ अभ्यासला होता.
शाळेतील विविध शिक्षकांकडून विद्यार्थ्यांच्या विविध कलेला वाव दिला जातो. त्यामध्ये कार्यानुभव या विषयांतर्गत ‘क्राफ्ट’ पेपरपासून विविध वस्तू बनवण्यास शिकवले जाते. त्याचा उपयोग त्याला सायकल बनवण्यासाठी झाला. सायकल पूर्ण तयार झाल्यानंतर ती पाहून त्याच्यासह कुटुंबातील आई-वडील, आजी -आजोबा, मामा- मामी, शेजारील काका-काकू व सोसायटीतील सर्व मित्रांना खूप आनंद झाला. त्याचे सर्वांनी कौतुक केले. त्याच्या मित्रांनी तशा प्रकारची सायकल बनवण्याचे आम्हाला शिकवण्याचा आग्रही धरला.

अशी बनली सायकल
सायकलचे महत्त्व माहिती होते. त्यामुळे जागतिक सायकल दिन साजरा करण्यासाठी त्याने जागतिक सायकल दिनाचे औचित्य साधून त्यांनी कागदापासून सायकल बनविण्याचा निश्चय केला. वर्तमानपत्रांपासून सायकल तयार करण्यास सुरुवात केली. सायकलसाठी त्याला पाच वर्तमानपत्रे, एक डिंकाची बॉटल, मोजपट्टी, एक लांब लाकडी काडी, गोल डब्बा याच्या साह्याने त्याने वर्तमानपत्राचे ७-२० सेंटीमीटर लांबी रुंदीचे आयात आकाराचे १०० कागदाचे तुकडे तयार करून कागदी काड्या तयार केल्या. या काड्यांपासून सायकलचा साच्या, सायकलची चाके, सायकलचे सीट, सायकलचे डंपर, सायकल कॅरिअर अशी सर्व सुटे भाग तयार करून एक एक भाग जोडून एक अतिशय सुंदर, देखणी अशी सायकल तयार केली. पूर्ण सायकल तयार करण्यासाठी त्याला अंदाजे ३ ते ४ तास वेळ लागला.

‘शोपिस’ म्हणून कोणी ठेऊ शकतो
यशराज याने आठ दिवसांपासून कागदाचे तुकडे गोळा करून त्यांचे कचरा गोळा करणाऱ्या झाडूच्या काड्यांचा वापर करून त्या कागदाचे रोल बनविले. त्या रोलपासून लहान मुलांना आवडेल अशी किंवा शोपिस म्हणून कोणी ठेवू शकतो, अशा सायकली बनविल्या आहेत. मुलींची पसंती गुलाबी रंग ही असते आणि त्याप्रमाणे मुलींची सायकल पिंक रंगाने रंगवली आहे. तर मुलांची सायकल ही साधारण निळ्या रंगाची असते आणि त्याप्रमाणे सायकल त्याने बनविली आहे. आपला छंद जोपासण्यासाठी घडविलेल्या सायकलिंगमध्ये सर्वकाही आहे.