मेट्रो प्रवाशांना रोपांचे वाटप

मेट्रो प्रवाशांना रोपांचे वाटप

पिंपरी, ता. ७ : शहरातील दुर्गादेवी उद्यान, एमआयडीसी तसेच संत तुकारामनगर मेट्रो स्टेशन या भागामध्ये वृक्षारोपण करून पर्यावरण दिन साजरा करण्यात आला.
प्राधिकरण व्यापारी असोसिएशनच्या वतीने निगडी येथील दुर्गादेवी उद्यान येथे १०१ वृक्षारोपण करण्यात आले. यामध्ये निंब,करंज, भेंडी, वाढ, पिंपळ आणि फणस आदी झाडांचा समावेश आहे. प्राधिकरण व्यापारी असोसिएशनचे अध्यक्ष मुकेश सावरकर, दुर्गादेवी उद्यान अधीक्षक अशोक वायकर यांच्या हस्ते हे वृक्षारोपण करण्यात आले.
संत तुकारामनगर मेट्रो स्टेशन येथे वृक्षारोपण करण्याबरोबरच मेट्रोमधील प्रवाशांना वृक्षवाटप करून पर्यावरण संदेश देण्यात आला. मेट्रोचे कार्यकारी संचालक हेमंत सोनवणे यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. दुर्गा ब्रिगेड संघटनेच्या अध्यक्षा दुर्गा भोर व अन्य कार्यकर्ते उपस्थित होते.
भोसरी एमआयडीसी परिसरातही उद्योजकांच्यावतीने पर्यावरण दिन साजरा करण्यात आला. डेक्कन मेकॅनिकल इंडस्ट्री येथे इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष अभय भोर यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. ‘माझी एमआयडीसी ग्रीन एमआयडीसी’ हा संदेश त्यांनी यावेळी दिला. प्रत्येक उद्योजकाने कंपनीच्या बाहेर वृक्षारोपण करून हरित एमआयडीसी करण्यास पाठबळ द्यावे’ असे आवाहनही त्यांनी केले.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com