छत्रपती शिवाजी महाराजांना महापालिकेतर्फे अभिवादन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

छत्रपती शिवाजी महाराजांना
महापालिकेतर्फे अभिवादन
छत्रपती शिवाजी महाराजांना महापालिकेतर्फे अभिवादन

छत्रपती शिवाजी महाराजांना महापालिकेतर्फे अभिवादन

sakal_logo
By

पिंपरी, ता. ६ ः हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेक सोहळ्याला ३५० वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्ताने महाराजांच्या शहरातील १४ पुतळ्यांना पुष्पहार अर्पण करून महापालिकेतर्फे अभिवादन करण्यात आले.
महापालिका मुख्य प्रशासकीय इमारतीत प्रशासक शेखर सिंह यांनी महाराजांच्या प्रतिमेस आणि निगडीतील छत्रपती शिवाजी महाराज व जगद्‍गुरू संत तुकाराम महाराज यांच्या भक्ती-शक्ती समूहशिल्पास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. अतिरिक्त आयुक्त जितेंद्र वाघ, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉ. राजेंद्र वाबळे, उपआयुक्त अजय चारठाणकर, रविकिरण घोडके, मनोज लोणकर, सहाय्यक आयुक्त विजयकुमार थोरात, आण्णा बोदडे, प्रशासन अधिकारी सोनम देशमुख आदी उपस्थित होते. पिंपरीतील व एचए कॉलनीतील पुतळ्यास अतिरिक्त आयुक्त उल्हास जगताप यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. उपआयुक्त रविकिरण घोडके, जनता संपर्क अधिकारी प्रफुल्ल पुराणिक, सुरेंद्र पासलकर, मारुती लोखंडे, तात्या माने, संजय खेंगरे, सर्जेराव जुनवणे, अरुण बोऱ्हाडे उपस्थित होते. मोहननगर चिंचवड येथील पुतळ्यास क्षेत्रिय अधिकारी सुचिता पानसरे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. माजी नगरसेवक मारुती भापकर उपस्थित होते. लांडेवाडी, कासारवाडी, फुगेवाडी आणि दापोडी येथील पुतळ्यास क्षेत्रिय अधिकारी उमेश ढाकणे यांनी अभिवादन केले. सहायक आरोग्याधिकारी बाबासाहेब कांबळे उपस्थित होते. क्षेत्रीय अधिकारी अमित पंडित यांनी प्रेमलोक पार्क येथील पुतळ्यास पुष्पाहार अर्पण करून अभिवादन केले. ई क्षेत्रीय अधिकारी राजेश आगळे यांनी भोसरीतील पीएमटी चौक, मोशी चौकातील पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. प्रशासन अधिकारी नाना मोरे, कार्यालय अधिक्षक ज्ञानेश्वर ढवळे उपस्थित होते. रहाटणी, थेरगाव गावठाण, डांगे चौक येथील पुतळ्यास ग क्षेत्रीय अधिकारी शितल वाकडे यांनी पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले. सहाय्यक आरोग्याधिकारी कुंडलिक दरवडे उपस्थित होते.