जलतरण तलावांची शुल्कवाढ

जलतरण तलावांची शुल्कवाढ

पिंपरी, ता.७ : महापालिकेच्या जलतरण तलावाचे तिकीट आणि पास दर दुपटीने मध्ये वाढविण्यात आले आहेत. आता ४५ मिनिटे पोहण्यासाठी दहाऐवजी वीस रुपये मोजावे लागणार आहेत. मासिक, तिमाही व वार्षिक पास दरात वाढ करण्यास आयुक्त शेखर सिंह यांनी मान्यता दिली.
महापालिकेच्या वतीने शहरात केशवनगर, संभाजीनगर, पिंपरीगाव, यमुनानगर, पिंपळे गुरव, नेहरूनगर, वडमुखवाडी, भोसरी, मोहननगर, थेरगाव, सांगवी, आकुर्डी या भागात एकूण १३ जलतरण तलावांची उभारणी करण्यात आली आहे. जलतरण तलावातून मिळणारे उत्पन्न व त्यावर होणार खर्च यामध्ये मोठी तफावत आहे. ही तफावत कमी करण्यासाठी जलतरण तलाव शुल्कामध्ये वाढ करण्याचा निर्णय घेतल्याचे प्रशासनाकडून सांगण्यात आले.
जलतरण तलावात पोहण्याची वर्षभराच्या एक तुकडी ४५ मिनिटांची असते. त्यासाठी पूर्वी दहा रुपये शुल्क होते. आता वीस रुपये मोजावे लागणार आहेत. लॉकर फी तीन महिन्यांसाठी पन्नास ऐवजी तीनशे रुपये व वर्षासाठी शंभर ऐवजी एक हजार दोनशे रुपये असणार आहे. १२ ते ६० वयोगटातील सर्व नागरिकांना मासिक पाससाठी चारशे ऐवजी पाचशे रुपये मोजावे लागणार आहेत. तर; तिमाहीसाठी सातशे ऐवजी एक हजार दोनशे रुपये दर आहे. वर्षभराच्या पाससाठी एक हजारांऐवजी चार हजार पाचशे रुपये भरावे लागणार आहेत. लॉकर शुल्क तीन महिन्यांसाठी पन्नासऐवजी तीनशे व वर्षासाठी शंभरऐवजी एक हजार दोनशे रुपये असणार आहे. स्पर्धा, सराव, शिबिरासाठी शाळा, महाविद्यालय, कंपनी, क्लब यांना नेहरूनगर तलावाचे एक तासाचे भाडे दोन हजार रुपये असेल. उर्वरित बारा तलावांचे भाडे दीड हजार रुपये आहे.

राष्ट्रीय खेळाडूंना पन्नास टक्के सवलत
बारा वर्षांखालील मुले व मुली, महापालिकेचे अधिकारी व कर्मचारी, राष्ट्रीय खेळाडू, पत्रकार, ज्येष्ठ नागरिक यांना मासिक, तिमाही व वार्षिक पाससाठी पन्नास टक्के सवलत दिली जाणार आहे. नगरसेवक, खेळाडू दत्तक योजनेतील जलतरण खेळाडू, पालिका शाळेचे विद्यार्थी, दिव्यांग विद्यार्थी, दिव्यांग नागरिक यांना पोहण्यासाठी मोफत प्रवेश असणार आहे.

‘‘महापालिकेचा जलतरण तलावांचे दर कमी होते. २००८ मध्ये दर वाढविले होते. पंधरा वर्षे दरात कोणतीही वाढ केली नव्हती. त्यामुळे दरवाढ केली आहे.’’
- मनोज लोणकर, उपायुक्त क्रीडा विभाग

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com