Fri, Sept 22, 2023

सुलोचना दीदी यांना
चिंचवडमध्ये श्रद्धांजली
सुलोचना दीदी यांना चिंचवडमध्ये श्रद्धांजली
Published on : 8 June 2023, 9:51 am
पिंपरी, ता. ८ ः ‘अभिनेत्री सुलोचनादीदी यांच्या निधनामुळे मराठी चित्रपटसृष्टीची मोठी हानी झाली असल्याची भावना वसंत कला फिल्मचे निर्माता मदन जोशी यांनी व्यक्त केली. चिंचवड येथे नुकत्याच पार पडलेल्या श्रद्धांजली सभेत ते बोलत होते. या सभेला ॲड. लक्षण रानवडे, दीपक सवाखंडे, रमेश चौधरी, विजय जगताप, स्मृती खैरे, आश्लेषा खैरे, मनाली जोशी आदी उपस्थित होते. या सर्वांनी दीदींच्या आठवणींना उजाळा दिला. सुलोचनादीदींच्या स्मृती जपण्यासाठी त्यांच्या नावाने पुरस्कार सुरु करण्याची घोषणा मदन जोशी यांनी यावेळी केली.