साडेचार हजार ग्राहक वीज मीटरच्या प्रतीक्षेत ‘पीएमआरडीए’च्या पेठ क्रमांक १२ मधील प्रकार | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

साडेचार हजार ग्राहक 
वीज मीटरच्या प्रतीक्षेत
‘पीएमआरडीए’च्या पेठ क्रमांक १२ मधील प्रकार
साडेचार हजार ग्राहक वीज मीटरच्या प्रतीक्षेत ‘पीएमआरडीए’च्या पेठ क्रमांक १२ मधील प्रकार

साडेचार हजार ग्राहक वीज मीटरच्या प्रतीक्षेत ‘पीएमआरडीए’च्या पेठ क्रमांक १२ मधील प्रकार

sakal_logo
By

पिंपरी, ता. ७ : ‘पीएमआरडीए’च्या पेठ क्रमांक १२ मधील गृह प्रकल्पाच्या लाभार्थ्यांनी ४ हजार ५०० वीजमीटरसाठी महावितरणच्या भोसरी शाखेकडे मागणी केली. मात्र, कार्यालयात पुरेसे मनुष्यबळ नसल्यामुळे ‘कोटेशन’ काढण्यास विलंब होत आहे.
दरम्यान, शाखा कार्यालयात मनुष्यबळ उपलब्ध करून देण्यात यावे, अशी मागणी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे शहर संघटक तथा विद्युत संनियंत्रण समितीचे सदस्य संतोष सौंदणकर यांनी केली. यासंदर्भात सौंदणकर यांनी पुणे परिमंडळचे मुख्य अभियंता राजेंद्र पवार यांना निवेदन दिले.
त्यात म्हटले आहे, की ‘पीएमआरडीए’ने पेठ क्रमांक १२ येथे आर्थिक दुर्बल आणि अल्प उत्पन्न गटातील नागरिकांसाठी गृह प्रकल्प विकसित केला आहे. त्यातील लाभार्थ्यांनी ४ हजार ५०० वीजमीटरसाठी भोसरी शाखा कार्यालयाकडे अर्ज केले आहेत. एवढ्या लाभार्थ्यांना एकाच वेळी एवढ्या मोठ्या संख्येने मीटर उपलब्ध करून देणे शक्‍य नाही. नागरिकांना वेळेत मीटर देण्यासाठी महावितरणकडून भोसरी शाखा कार्यालयात अतिरिक्त तीन ते चार कर्मचारी उपलब्ध करून द्यावेत. जेणेकरुन मीटरसाठी येणाऱ्या नागरिकांना कोटेशन काढून देणे, विद्युत विषयक कामकाज करणे सोयीचे होईल.