भोसरीतील हरिनाम सप्ताहाची पारायण व कीर्तनाने सांगता | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

भोसरीतील हरिनाम सप्ताहाची
पारायण व कीर्तनाने सांगता
भोसरीतील हरिनाम सप्ताहाची पारायण व कीर्तनाने सांगता

भोसरीतील हरिनाम सप्ताहाची पारायण व कीर्तनाने सांगता

sakal_logo
By

पिंपरी ता. ३ ः शांतीनगर भोसरी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर ट्रस्टच्या वर्धापन दिनानिमित्त अखंड हरिनाम सप्ताह व ज्ञानेश्वरी पारायण कीर्तन महोत्सव आयोजित करण्यात आला होता. त्यांची सांगता संत एकनाथ महाराज यांचे वंशज योगीराजमहाराज गोसावी यांच्या काल्याच्या कीर्तनाने झाली. सतीशमहाराज पंचभाई, वैजनाथमहाराज जगदाळे, उल्हासमहाराज सूर्यवंशी, नानामहाराज सूर्यवंशी, चंद्रकांतमहाराज वांजळे, पांडुरंगमहाराज साळुंखे, ज्ञानेश्वरमहाराज बोगीर यांनी कीर्तनसेवा केली. आमदार महेश लांडगे, माजी आमदार विलास लांडे, माजी नगरसेवक वसंत लोंढे, संतोष लोंढे, विक्रांत लांडे, अजित गव्हाणे, नितीन लांडगे, बाळासाहेब गव्हाणे, माजी नगरसेविका सोनाली गव्हाणे, भीमाबाई फुगे, पंडित गवळी, नंदू लांडे भाऊसाहेब लांडे आदींचे सहकार्य लाभले. व्यासपीठ नेतृत्व मारुतीमहाराज भुजबळ, मधुकरमहाराज पडवळ, मारुतीमहाराज फुगे, बापू भुजबळ, भारत भुजबळ, विराज लांडे आदींनी केले, अशी माहिती ट्रस्टचे अध्यक्ष विश्वनाथ लांडे यांनी दिली.