वासराला कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या चौघांवर गुन्हा | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

वासराला कत्तलीसाठी 
घेऊन जाणाऱ्या चौघांवर गुन्हा
वासराला कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या चौघांवर गुन्हा

वासराला कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या चौघांवर गुन्हा

sakal_logo
By

पिंपरी, ता. ५ : वासरला रिक्षातून निर्दयतेने कत्तलीसाठी घेऊन जाणाऱ्या चौघांवर रावेत पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार रावेत येथे घडला.
रिक्षाचालक अब्दुल मेहबूब सय्यद (रा. डी मार्टजवळ, चिंचवड स्टेशन), हर्षद कय्यूम कुरेशी (वय १९, रा. पिंपरी), पप्पू तुपे (वय २०, रा.रावेत) व एक अल्पवयीन मुलगा अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. या प्रकरणी अमोल नामदेव खुडे (रा. नेटके चाळ, विकासनगर, देहूरोड) यांनी फिर्याद दिली आहे. फिर्यादी हे पिंपरी-चिंचवड पोलिस दलात नाईक पदावर कार्यरत असून ते मॉर्निंग वॉकसाठी त्यांच्या दुचाकीवरून निगडी प्राधिकरणातील गणेश तलाव येथे जात होते. त्यावेळी बीआरटी रोडवरील क्वीन्स टॉवर येथे एक रिक्षा भरधाव जाताना दिसली. फिर्यादी यांना संशय आल्याने त्यांनी रिक्षा थांबवून चौकशी केली. त्यावेळी आरोपी सय्यद, कुरेशी व अल्पवयीन मुलगा यांनी तुपे याच्याकडून कत्तलीसाठी वासरू खरेदी केल्याचे समोर आले. खोंडाला रिक्षात निर्दयतेने बांधून पोत्यात झाकून चिंचवड स्टेशन शेजारील मोकळ्या जागेत कत्तलीसाठी घेऊन जात होते. रावेत पोलिस अधिक तपास करीत आहेत.