‘नॉन क्रिमिलेअर’ चे निकष शिथिल करण्याची मागणी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘नॉन क्रिमिलेअर’ चे निकष शिथिल करण्याची मागणी
‘नॉन क्रिमिलेअर’ चे निकष शिथिल करण्याची मागणी

‘नॉन क्रिमिलेअर’ चे निकष शिथिल करण्याची मागणी

sakal_logo
By

पिंपरी, ता. ७ : महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या मुख्य परीक्षेच्या मुलाखती दरम्यान ‘नॉन क्रिमिलेअर’ प्रमाणपत्राच्या संदर्भात चुकीचा निकष लोकसेवा आयोगाकडून लावण्यात आला आहे. त्यामुळे भटके, विमुक्त, ओबीसी समाजातील उमेदवारांवर अन्याय होणारा असून, त्यांचे अतोनात नुकसान होणार आहे. त्यामुळे निकषांमध्ये शिथीलता आणावी, अशी मागणी ओबीसी नेते प्रताप गुरव यांनी केली आहे.
वास्तविक ‘नॉन क्रिमिलेअर’ प्रमाणपत्र हे मागील आर्थिक वर्षाच्या आधारावर दिले जाते आणि तेच उत्पन्न खऱ्या अर्थाने ग्राह्य धरले पाहिजे, असे असताना चुकीचा अर्थ काढून चुकीचा निकष लावणे, हे योग्य नाही. सामान्य प्रशासन विभागाने तातडीने लक्ष घालून अटीमध्ये शिथीलता आणावी आणि ओबीसी भटके विमुक्त तसेच ई. डब्ल्यू. एस. उमेदवारांना दिलासा द्यावा, अशी मागणी प्रदेश बारा बलुतेदार महासंघ उपाध्यक्ष तथा राष्ट्रीय गुरव समाज महासंघाचे प्रदेशाध्यक्ष प्रताप गुरव यांनी केली आहे.