अंगारकी चतुर्थीनिमित्त शहरातील मंदिरात गर्दी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अंगारकी चतुर्थीनिमित्त 
शहरातील मंदिरात गर्दी 
विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
अंगारकी चतुर्थीनिमित्त शहरातील मंदिरात गर्दी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

अंगारकी चतुर्थीनिमित्त शहरातील मंदिरात गर्दी विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन

sakal_logo
By

पिंपरी, ता. १० : अंगारकी चतुर्थीनिमित्त शहरातील गणेश मंदिरात भाविकांनी दर्शनासाठी गर्दी केली होती. विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते.
चिंचवड गावातील श्रीमन महासाधू श्री मोरया गोसावी मंदिरात पहाटेपासूनच महापूजा, अभिषेक, आरती अशा धार्मिक कार्यक्रमांना सुरवात झाली. त्यानंतर दर्शन सुरु झाले. सकाळपासून रांगा लागल्या होत्या. अनेकांनी सहकुटुंब दर्शन घेतले. मंदिरात फुलांची सजावट केली होती. तसेच हार-फुले, प्रसाद, खेळण्याची दुकानेही सजली होती. शहरासह राज्याच्या विविध भागातील भाविकांनी मनोभावे दर्शन घेतले. परिसरात दिवसभर उत्साहाचे वातावरण होते.

यासह पिंपरी, चिंचवड, भोसरी, निगडी, मोशी, सांगवी, पिंपळे सौदागर, पिंपळे गुरव, वाकड, हिंजवडी, काळेवाडी, आकुर्डी, तळवडे आदी भागातील गणेश मंदिरांमध्येही भाविकांनी गर्दी केली होती. ठिकठिकाणच्या सार्वजनिक गणेश मंडळांनी धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन केले होते. भजन, कीर्तन यासह विविध स्पर्धाही घेण्यात आल्या. मंदिराला फुलांची सजावट करण्यासह महाप्रसादाचेही वाटप करण्यात आले. ठिकठिकाणी भक्तिगीते कानावर पडत होती. उत्साहाचे वातावरण होते. अनेकांनी व्रत करून गणरायाची मनोभावे पूजा केली. ‘गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया’ चा जयघोष करण्यात आला.

----------------------------