दापोडीतील जीवघेणा खड्डा दुरुस्त करा

दापोडीतील जीवघेणा खड्डा दुरुस्त करा

पुणे-मुंबई महामार्गावर असलेल्या दापोडीलगतच्या रस्त्यावर मोठा खड्डा पडल्याने रात्री नागरिकांचा अपघात होण्याची भीती निर्माण झाली आहे. कित्येकदा दुचाकी वाहन खड्ड्यात अडकत आहे. तर, कधी या खड्ड्यांतून वाहन काही अंतरावर उडून पुढे जात आहे. अनेक अधिकारी व कर्मचारी महापालिकेचे या ठिकाणाहून प्रवास करतात. आतापर्यंत कुणीही या ठिकाणी असलेल्या खड्डा बुजविण्याची तसदी घेतली नाही. महापालिकेने हा खड्डा त्वरित बुजवून नागरिकांचा जीव वाचवावा.
- महेश शिंदे, काळेवाडी

मोशीतील रस्त्यालगतची झाडे सुकली
मोशी येथील स्पाइन सिटी आवारातील झाडांना वेळेवर पाणी मिळत नसल्यामुळे झाडे सुकली आहेत. झाडांकडे कोणाचेही लक्ष नाही. महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी मोठ्या झाडांकडे लक्ष देणे अत्यावश्यक आहे. शिवाय या झाडांची निगा घेऊन त्यांना नियमित पाणी टाकणे गरजेचे आहे. कृपया शहरातील वनसंपदा टिकविण्यासाठी झाडांना लवकरात लवकर पाणी देण्यात यावे.

सुशोभित झाडे भटक्या श्वानांनी खाल्ली
उद्यानांमध्ये लावलेली फुलझाडे दुसऱ्याच दिवशी ओलाव्याच्या शोधात भटके श्वान उखडून टाकत आहेत. त्यामुळे पालिकेच्या फुलझाडांचे मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे. सकाळच्या वेळी उद्यानात कुत्र्यांची संख्या वाढल्यामुळे लहान मुले आणि ज्येष्ठ नागरिकांना विशेष त्रासाला सामोरे जावे लागत आहे. सुशोभीकरणासाठी लाखो रुपये खर्चून फुलझाडे व इतर शोभिवंत रोपे उद्यानातील कर्मचारी दररोज व्यवस्थित रित्या लावत आहेत. संत ज्ञानेश्वर उद्यानामध्ये झाडांच्या रोपांची नासधूस भटके श्वान करीत आहेत. वाढत्या भटक्या कुत्र्यांची संख्या शहराच्या उद्यानांचे नुकसान करीत आहे. त्यासाठी श्वान निर्बीजीकरण प्रक्रिया पारदर्शक व भ्रष्टाचारमुक्त राबविणे गरजेचे आहे.
- विजय पाटील, निगडी प्राधिकरण

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com