पिंपरी, दापोडीतील वाहतुकीत बदल

पिंपरी, दापोडीतील वाहतुकीत बदल

पिंपरी, दापोडीतील वाहतुकीत बदल

पिंपरी, ता. १३ : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीनिमित्त पिंपरी व दापोडी भागात विविध कार्यक्रमांचे आयोजन केले आहे. मिरवणुकाही निघणार आहेत. या पार्श्वभूमीवर शुक्रवारी (ता. १४) पिंपरी व दापोडीतील काही मार्गांवरील वाहतुकीत बदल केला जाणार आहे.
चिंचवड स्टेशन महावीर चौकाकडून पिंपरीतील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकाकडे सेवा रस्त्याने येणारी वाहतूक बंद करून ही वाहतूक डी मार्ट ग्रेडसेपरेटरमध्ये वळविण्यात येईल. नाशिक फाट्याकडून चौकात सेवा रस्त्याने येणारी वाहतूक बंद करून डेअरी फार्म ग्रेडसेपरेटर इन व एचपी पंप खराळवाडी ग्रेडसेपरेटर इन मधून वळविण्यात येणार आहे. स्व. इंदिरा गांधी उड्डाणपूल येथून चौकात येणारी वाहतूक बंद करून ही वाहतूक उड्डाणपुलावरून मोरवाडी चौकाकडे जाईल. नेहरूनगर चौकाकडून चौकाकडे येणारी वाहतूक एचए कॉर्नर बस थांबा येथून मासुळकर कॉलनीकडे वळवली जाईल. सम्राट चौक येथून मोरवाडी चौकाकडे जाणारा मार्ग वाहतुकीसाठी बंद असेल. सायन्स पार्ककडून मोरवाडी चौकाकडे येणारा मार्ग बंद राहणार आहे. ऑटो क्लस्टरकडून येणारी वाहतूक सेंट मदर टेरेसा ब्रिजकडे वळवली जाईल. क्रोमा शोरूमकडून गोकुळ हॉटेलकडे जाणारी वाहतूक बंद असेल. चौकाकडून इंदिरा गांधी उड्डाणपुलाकडे जाणारी वाहतूक आवश्यकतेनुसार बंद केली जाईल.
तसेच दापोडीतील वाहतुकीतही बदल करण्यात आले आहेत. हॅरिस ब्रिज ते फुगेवाडी चौक सेवा रस्त्याने जाणारा मार्ग बंद करून या मार्गावरील वाहतूक हॅरिस ब्रिजने ग्रेडसेपरेटरमधून जाईल. बोपोडी संविधान चौकाकडून दापोडी छत्रपती शिवाजी महाराज पुतळा येथे जाणारा मार्ग बंद असेल. या मार्गावरील वाहने हॅरिस ब्रिज दापोडी मार्गे इच्छित स्थळी जातील. शितळा देवी चौकाकडून दापोडी गावाकडे जाणारा मार्ग बंद करून या मार्गावरील वाहतूक शितळा देवी चौकाकडून सांगवी मार्गे इच्छित स्थळी जाईल. हा बदल शुक्रवारी दुपारी तीनपासून रात्री मिरवणुका संपेपर्यंत असेल.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com