
कचरा शुल्क, एलबीटी भरण्यास हॉटेल रेस्टॉरंट असोसिएशनचा विरोध
पिंपरी, ता. १८ : कचरा शुल्क व एलबीटी भरण्यास पिंपरी-चिंचवड हॉटेल रेस्टॉरंट असोसिएशनने विरोध केला आहे. त्याबाबत, आयुक्त शेखर सिंह यांच्यासोबत १३ एप्रिल रोजी असोसिएशनची बैठक पवळे सभागृहामध्ये झाली.
बैठकीला अतिरिक्त आयुक्त संदीप वाघ, रामदास तांबे, मुख्य आरोग्य अधिकारी, सहशहर अभियंता, स्मार्ट सिटीचे अधिकारी किरण लवटे व सुरेंद्र कुमार उपस्थित होते. संस्थेचे अध्यक्ष पद्मनाभ शेट्टी, कार्याध्यक्ष गोविंद पानसरे, सचिव सत्यविजय तेलंग, उपाध्यक्ष रमेश तापकीर, हरीश शेट्टी, शंकर चक्रवती, विश्वनाथ शेट्टी, किरण सुवर्ण व इतर सभासद उपस्थित होते. बैठकीत, महापालिका आणि हॉटेल संस्थेच्यावतीने आस्थपनांच्या सहभागातून कचरा संकलन करुन त्याद्वारे सीएनजी गॅसची निर्मिती कंपनी करणार आहे. ओला व सुका कचरा वर्गीकरण करुन वेळेत उपलब्ध करुन देणे. कंपनीतर्फे विभागवार वाहने पाठवून वर्गीकरण करुन एजन्सीकडे जमा करणे गरजेचे आहे. मोशीत कचरा जिरवला जणार आहे. कचरा विलगीकरणासाठी प्रशिक्षण दिले जाणार आहे. सीएनजी गॅस आस्थापनांना कमी दरात उपलब्ध करुन देतील असे अजित कुडे यांनी विषद केले. प्रास्ताविक गोविंद पानसरे यांनी केले. पद्मनाभ शेट्टी यांनी आभार मानले.