गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

मोबाईल न दिल्याने तरुणावर कोयत्याने हल्ला
पिंपरी : मोबाईल न दिल्याच्या रागातून तरुणावर कुऱ्हाड, कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. ही घटना भोसरी येथे घडली. याप्रकरणी तरुणाच्या दोन अल्पवयीन मित्रांवर गुन्हा दाखल झाला आहे. कुणाल सचिन डाके (वय १९) असे या हल्ल्यात जखमी झालेल्या तरुणाचे नाव आहे. त्याच्या आईने फिर्याद दिली आहे. आरोपी व फिर्यादी हे भोसरीतील पीसीएमटी चौक येथे असताना कुणाल याने त्याचा मोबाईल मित्रांना दिला नाही. यावरुन दोघांनी चिडून कुणाल याच्यावर कुऱ्हाड व कोयत्याने प्राणघातक हल्ला केला. यामध्ये कुणाला गंभीर जखमी झाला. भोसरी पोलिस अधिक तपास करीत आहेत.

विवाहितेचा
पैशांसाठी छळ
पिंपरी, ता. १७ : इलेक्शनसाठी माहेराहून पैसे आणण्यासाठी विवाहितेचा छळ केल्याप्रकरणी सासरच्यांवर गुन्हा दाखल झाला आहे. हा प्रकार अहमदनगर येथे घडला. विशाल कडू इंगळे, सासरा कडू शवराव इंगळे, नांदावा भाऊसाहेब देवरा गायकवाड (सर्व रा. सम्राटनगर,शेवगाव, जि . अहमदनगर) अशी गुन्हा दाखल झालेल्यांची नावे आहेत. इलेक्शनसाठी माहेराहून पाच लाख रुपये आणण्यासाठी विवाहितेला शिवीगाळ व मारहाण केली. त्यांचा मानसिक व शारीरिक छळ केला.


पुनावळेमध्ये
तीन दुकाने फोडली
पिंपरी, ता. १७ : पुनावळे येथे तीन दुकानांचे शटर उचकटून ऐवज लंपास केल्याची घटना घडली.
वैभव विद्याधर अफजलपूरकर (रा. प्रभात कॉलनी, केशवनगर, चिंचवड) यांनी फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञात चोरट्यावर गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी यांचे पुनावळे येथील सिद्धसिला इला सोसायटीच्या बाहेरील मिठाईचे दुकान, बेकरी तसेच सुखदा अपार्टमेंट येथील आदित्य काकडे यांच्या हार्डवेअर दुकानाचे शटर उचकटून चोरटे आत शिरले. ही तिन्ही दुकाने मिळून ६८ हजार ७८० रुपये किमतीचा ऐवज चोरट्याने लंपास केला.


महिलेच्या पर्समधून
दीड लाखाचे दागिने लंपास
पिंपरी, ता. १७ : चिंचवड येथील चापेकर चौक येथील बस थांब्यावर थांबलेल्या महिलेच्या पर्स मधून १ लाख ४५ हजार रुपयांचे दागिने महिला चोरट्याने लंपास केले. विशाल शिवाजी इंगवले (रा. केशवनगर, चिंचवड) यांनी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. फिर्यादी यांच्या पत्नी बस थांब्यावर थांबल्या असताना महिला चोरट्याने त्यांची नजर चुकवून त्यांच्या पर्समधून १ लाख ४५ हजार रुपयांचे सोन्याचे दागिने चोरून नेले.

भाडे मागितल्याने
घरमालकाला मारहाण
पिंपरी, ता. १७ : थकलेले भाडे मागितल्याने घरमालकाला घरात शिरून मारहाण करीत शिवीगाळ केली. ही घटना पिंपरीतील मिलिंदनगर येथे घडली. कैलास विरुमल लाडी (रा. मिलिंदनगर, पिंपरी) याच्यावर गुन्हा दाखल झाला आहे. महिलेने पिंपरी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. आरोपी हा फिर्यादी महिलेच्या घरात भाड्याने राहतो. त्याने डिसेंबर २०२२ पासून भाडे दिलेले नाही. महिलेने पैसे मागितले असता आरोपीने पैसे नही दुंगा, जो करना है करलो, मै क्या करता हूं, दिखाता हू, असे म्हणत महिलेला मारहाण करीत धमकी दिली. महिलेची बहिण व मुलीला शिवीगाळ केली.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com