पतीच्या छळाला कंटाळून पत्नीची आत्महत्या | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

पतीच्या छळाला कंटाळून पत्नीची आत्महत्या
पतीच्या छळाला कंटाळून पत्नीची आत्महत्या

पतीच्या छळाला कंटाळून पत्नीची आत्महत्या

sakal_logo
By

पतीच्या छळाला
कंटाळून आत्महत्या

पिंपरी, ता. १८ : घरगुती कारणावरून पतीकडून होत असलेल्या छळाला कंटाळून पत्नीने गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना दिघी येथे घडली.
माधुरी सोमनाथ साकोरे (वय ३६, रा. चौधरी पार्क, दिघी) असे आत्महत्या केलेल्या विवाहितेचे नाव आहे. तर सोमनाथ बबन साकोरे (वय ४०) असे त्यांच्या पतीचे नाव असून त्याला दिघी पोलिसांनी अटक केली. याप्रकरणी माधुरी यांचे भाऊ हेमंत रामदास मेगडे (रा. सिंहगड रोड, वडगाव बुद्रूक) यांनी फिर्याद दिली आहे. सोमनाथ याने २००४ पासून अद्यापपर्यंत घरगुती कारणावरून वेळोवेळी माधुरी यांना मारहाण, शिवीगाळ व दमदाटी केली. मानसिक व शारीरिक छळ करीत क्रूर वागणूक दिली. या छळाला कंटाळून माधुरी यांनी राहत्या घरातील छताच्या तुळईला ओढणीच्या साहाय्याने गळफास घेऊन आत्महत्या केली. त्यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सोमनाथ याच्यावर गुन्हा दाखल करून त्याला अटक केली.