Sat, Sept 23, 2023

डोळसनाथ महाराज मंदिरामध्ये
विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
डोळसनाथ महाराज मंदिरामध्ये विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन
Published on : 19 April 2023, 9:35 am
तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. १९ : ग्रामदैवत श्री डोळसनाथ महाराज मंदिरामध्ये अक्षय तृतीयानिमित शनिवारी (ता. २२) विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती राजेश सरोदे, यतीन शहा, अजय भेगडे, हेमंत दाभाडे यांनी दिली. त्यामध्ये चंदन उटी, रूद्रयाग, भंडारा, महापूजा, अभिषेक, हरिपाठ, भजन, प्रवचन, महाआरती आदी कार्यक्रम होणार आहेत. तसेच काळभैरवाष्टक पठण व दीपमाळ प्रज्ज्वलन होणार आहे. यतीराज महाराज लोहोर भागवताचार्य यांचे प्रवचन होणार आहे. तसेच महाप्रसादाचे वाटप करण्यात येणार आहे.