निगडीत महिलांसाठी मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

निगडीत महिलांसाठी मोफत 
स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर
निगडीत महिलांसाठी मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर

निगडीत महिलांसाठी मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर

sakal_logo
By

पिंपरी, ता. २० ः भारतीय संस्कृती मंच आणि मणिकर्णिका प्रतिष्ठान यमुनानगर यांनी शहरातील १० ते ६० वयोगटातील महिलांसाठी मोफत स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर आयोजित केले आहे. ‘हर घर दुर्गा’ अभियानांतर्गत २४ ते २९ एप्रिल कालावधीत दररोज सायंकाळी सहा ते आठ या वेळेत यमुनानगर, निगडी येथील धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज क्रीडांगणावर (ज्युबली मैदान, शिवभूमी शाळेसमोर) शिबिर होईल. यामध्ये लाठी-काठी, नेमबाजी, निशस्त्र स्वसंरक्षण याबाबत प्रशिक्षण दिले जाईल, असे मुक्ता गोसावी यांनी कळविले आहे.