खाटिक समाज चॅरिटेबल ट्रस्टतर्फे 
श्री खंडोबा भंडारा उत्सव उत्साहात

खाटिक समाज चॅरिटेबल ट्रस्टतर्फे श्री खंडोबा भंडारा उत्सव उत्साहात

पिंपरी, ता. २१ ः पिंपरी-चिंचवड हिंदू खाटिक समाज चॅरिटेबल ट्रस्टतर्फे श्री खंडोबा भंडारा उत्सव उत्साहात झाला. त्यानिमित्त विविध कार्यक्रम आयोजित केले होते. ट्रस्टची नवीन कार्यकारिणीही नियुक्त केली.
श्री खंडोबाचा चैत्र तळी उचलल्यानंतर पूजन करून मिरवणूक काढली. येळकोट येळकोट जय मल्हार’ जयघोष झाला. आमदार अण्णा बनसोडे, ॲड. व्यंकटेश बेंद्रे, सुजित धनगर, पंकज निकुड, करण इंगुले आदी उपस्थित होते. मनोहर बागूल यांनी प्रास्ताविक केले. राजेंद्र थोरपे यांनी आभार मानले. समाजातील महिला बचत गटांतर्फे हितगूज कार्यक्रमांतर्गत विधवा व उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार केला. आमदार अश्विनी जगताप, माजी नगरसेविका अश्विनी चिंचवडे, जेजुरीच्या माजी नगराध्यक्षा अमृता घोणे आदी उपस्थित होत्या. आराध्या क्षीरसागरचे ‘छत्रपती शिवराय’ विषयावर व्याख्यान झाले. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर कृतज्ञता अभियानांतर्गत त्यांच्या मोरवाडी चौकातील पुतळ्यास अभिवादन केले. चिंचवड येथे पवना नदी परिसर स्वच्छता अभियान राबवून प्लॅस्टिक कचरा संकलन केला. सहायक आरोग्य निरीक्षक राजीव साबळे यांनी ‘शून्य कचरा संकल्पना व कचरा वर्गीकरण’ विषयी मार्गदर्शन केले.

अध्यक्षपदी थोरपे
पिंपरी-चिंचवड हिंदू खाटिक समाज चॅरिटेबल ट्रस्टच्या अध्यक्षपदी राजेंद्र थोरपे यांची निवड झाली. कार्यकारिणीत उपाध्यक्ष चंद्रकांत थोरात; सहउपाध्यक्ष शिकंदर घोडके, अविनाश कांबळे, संदीप कांबळे; सुरेश थोरात (सचिव), विनायक थोरात (सहसचिव), सूरज बेंद्रे (खजिनदार), संदीप क्षीरसागर (सहखजिनदार), महेंद्र घोणे (कार्याध्यक्ष), दत्तात्रेय क्षीरसागर, अशोक लाड, उमाकांत कांबळे, प्रसाद तरडे (सहकार्याध्यक्ष), ॲड. अमित कोथमिरे, ॲड. सुभाष घोलप यांचा समावेश आहे.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com