काळजाचा ठाव घेण्याचे 
सामर्थ्य कवितेत ः सबनीस
शब्दधन काव्यमंचतर्फे छावा काव्य पुरस्कार वितरण

काळजाचा ठाव घेण्याचे सामर्थ्य कवितेत ः सबनीस शब्दधन काव्यमंचतर्फे छावा काव्य पुरस्कार वितरण

पिंपरी, ता. २४ ः कविता मानववादी असते, परंतु तिला कोणताही धर्म नसतो. भौगोलिकतेच्या सर्व सीमा ओलांडून रसिकांच्या काळजाचा ठाव घेण्याचे सामर्थ्य कवितेत असते, असे मत ज्येष्ठ समीक्षक प्रा. डॉ. श्रीपाल सबनीस यांनी व्यक्त केले.
शब्दधन काव्यमंचतर्फे चिंचवड येथील प्रतिभा महाविद्यालयात आयोजित काव्यपुरस्कार प्रदान सोहळ्यात ते बोलत होते. ज्येष्ठ कवयित्री ललिता सबनीस यांच्या हस्ते पुरस्कार वितरण झाले. श्रीकांत चौगुले (शब्दधन काव्यप्रतिभा), हेमंत जोशी आणि सुभाष चटणे (स्वर्गीय अरविंद भुजबळ स्मृती); ज्योती शिंदे (रोहा, रायगड), स्वप्ना जगदाळे (नागपूर) दत्तात्रेय खंडाळे (पुणे), शामला पंडित, मयुरेश देशपांडे, अरुण कांबळे, योगिता कोठेकर यांना शब्दधन छावा काव्य पुरस्कार प्रदान करून सन्मानित केले. स्वागताध्यक्ष नंदकुमार मुरडे, ज्येष्ठ कवयित्री मधुश्री ओव्हाळ, डॉ. राजेंद्र कांकरिया उपस्थित होते. काव्यमंचाचे संस्थापक अध्यक्ष सुरेश कंक यांनी ‘सुंदर ते ध्यान उभे विटेवरी’ ही भक्ती रचना सादर केली. सुभाष चव्हाण यांनी प्रास्ताविक केले. प्रदीप गांधलीकर यांनी सूत्रसंचालन केले. नंदकुमार कांबळे यांनी आभार मानले.
---
फोटो ः 39076

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com