
नेहरूनगरमधील न्यायालय लवकरच होणार सुरू
पिंपरी, ता. २४ : पिंपरी, नेहरुनगर येथील नवीन न्यायालयाच्या इमारतीचे उद्घाटन लवकरच होणार आहे. या इमारतीमध्ये ५ दिवाणी व फौजदारी न्यायालयाचे स्थलांतर होणार आहे. नेहरुनगरमध्ये आणखी नवीन ६ प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी न्यायालये होणार आहेत. असे एकूण ११ न्यायालयाचे कामकाज लवकरच चालू होणार असल्याचे पिंपरी-चिंचवड बार असोसिएशनकडून सांगण्यात आले आहे.
पिंपरी, मोरवाडी येथील जुन्या इमारतीमध्ये सेशन कोर्ट, दिवाणी न्यायालय वरिष्ठस्तर व मोटार व्हेइकल्स कोर्टाची मागणी केलेली आहे. सदरचे न्यायालय लवकरच मंजूर होणार आहे. हिंजवडी पोलिस स्टेशन व रावेत पोलिस स्टेशनचे सर्व कामकाज लवकरच पिंपरी येथील न्यायालयात वर्ग होणार असून, न्यायालयात कामकाज चालू होणार आहे. त्यामुळे, पिंपरी-चिंचवडमधील नागरिकांचा त्रास कमी होणार आहे. वेळ व पैसा वाचणार आहे, अशी माहिती पिंपरी चिंचवड ॲडव्होकेट बार असोसिएशनच्या महिला सचिव ॲड. प्रमिला गाडे यांनी दिली आहे.