चिंचवडमध्ये ६ मे रोजी ‘एल्गार परिषद’

चिंचवडमध्ये ६ मे रोजी ‘एल्गार परिषद’

पिंपरी, ता. २७ : मराठा आरक्षणाचा लढा आणखी तीव्र करण्यासाठी मराठा आरक्षण समन्वय समिती, मराठा क्रांती मोर्चा, सकल मराठा समाज यांची पुणे, पिंपरी चिंचवड येथे ६ मे रोजी मराठा आरक्षण एल्गार परिषद घेण्यात येणार आहे, अशी माहिती मराठा आरक्षण समन्वय समितीचे महाराष्ट्र अध्यक्ष सुभाष जावळे पाटील यांनी दिली.
पिंपरी येथे मंगळवारी आयोजित केलेल्या पत्रकार परिषदेत छावा मराठा युवा महासंघाचे संस्थापक अध्यक्ष धनाजी येळकर पाटील, संभाजी सेनेचे संस्थापक अध्यक्ष सुधाकरराव माने, संभाजी सेनेचे प्रदेशाध्यक्ष रामेश्वर शिंदे, मराठा आरक्षण समन्वय समितीचे सचिव चंद्रकांत सावंत, मराठा आरक्षण समन्वय समितीचे उपाध्यक्ष देविदास राजळे पाटील, रूपाली राक्षे पाटील अनिता पाटील, संतोष वाघे, दादासाहेब पाटील, विजय कोरडे, गणेश सरकटे पाटील, गणेश भांडवलकर, सूरज ठाकर, आकाश हरकरे, हेमलता लांडे पाटील, जिल्हाध्यक्ष महिला आघाडी ज्योती सगर आदी पदाधिकारी उपस्थित होते.
आकुर्डी येथील पुणे-मुंबई महामार्गावरील श्रमशक्ती भवनात सहा मे रोजी दुपारी बारा वाजता होणाऱ्या या एल्गार परिषदेत महाराष्ट्रातील सर्व जिल्हा, तालुका समन्वयक, प्रतिनिधी उपस्थित राहणार आहेत. या एल्गार परिषदेमधून सरकारला विविध मागण्यासाठी अंतिम इशारा देण्यात येणार आहे.

या आहेत मागण्या
- मराठा आरक्षणाचा प्रश्न तत्काळ सोडवावा
- आरक्षण मिळत नाही तोपर्यंत नोकर भरती करू नये
- अरबी समुद्रातील छत्रपती शिवरायांच्या स्मारकाचे काम तत्काळ सुरू करावे
- पंजाबराव देशमुख निर्वाण भत्ता व वसतिगृहाचा लाभ सरसकट मराठा विद्यार्थ्यांना मिळावा
- अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळातून मिळणाऱ्या कर्ज प्रकरणासाठीच्या जाचक अटी रद्द कराव्यात
- कोपर्डी प्रकरणातील आरोपींना झालेल्या फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी तत्काळ करावी
- मराठा आरक्षणाच्या आंदोलनातील आंदोलकांवरील सर्व गुन्हे मागे घ्यावेत

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com