‘पीएमआरडीए’चा दावा खोटा

‘पीएमआरडीए’चा दावा खोटा

पिंपरी, ता. २६ : भक्ती-शक्ती समूह शिल्पाजवळील भूखंडावर ‘शिवसृष्टी’ उभारण्यात यावी, यासाठी भक्ती-शक्ती शिवजयंती उत्सव समितीने १० एप्रिल २०२३ पर्यंत कुठलाही पत्रव्यवहार नव्हता, असा पुणे महानगर क्षेत्रीय विकास प्राधिकरणाने (पीएमआरडीए) केलेला दावा खोटा असल्याचे प्रतिपादन समितीचे जीवन बोराडे यांनी बुधवारी (ता. २६) केले. या बाबत महापालिका व प्राधिकरणाचे ११ पत्रव्यवहार समितीने सादर केले.
भक्ती-शक्ती शिवजयंती उत्सव समितीच्या वतीने गेल्या दहा वर्षांपासून या ठिकाणी शिवजयंती मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. गेल्या पाच वर्षांपासून या जागेची आम्ही तोंडी मागणी करीत होतो. १९ फेब्रुवारी २०२३ रोजी पेठ क्रमांक २४ येथे याच शिवतीर्थ मैदानावर महानाट्याच्या व्यासपीठावरून महापालिका आयुक्त शेखर सिंह यांनी आम्हाला या ठिकाणी शिवसृष्टी उभी करू म्हणून १५ हजार शिवप्रेमींच्या उपस्थितीत जाहीर आश्‍वासन दिले होते, असे जीवन बोराडे यांनी प्रसिद्धीस दिलेल्या निवेदनात म्हटले आहे.
पिंपरी-चिंचवड शहराचे प्रमुख आकर्षण व प्रवेशद्वार असणाऱ्या जगद्‍गुरू संत तुकाराम महाराज व छत्रपती शिवाजी महाराज यांच्या ऐतिहासिक व धार्मिक वारसा सांगणाऱ्या तसेच; जगद्‍गुरू संत तुकाराम महाराज पालखी सोहळ्याच्या ऐतिहासिक स्वागताची साक्ष देणाऱ्या भक्ती-शक्ती समूह शिल्पा शेजारील जागेचे व्यापारीकरण केले जात आहे. या पवित्र वास्तूचा इतिहास मोडून काढून बिल्डरच्या घशात घालण्याचा प्रयत्न पीएमआरडीए प्रशासनाकडून होत आहे.
पिंपरी-चिंचवडमधील तमाम शिवप्रमेींच्यावतीने भक्ती-शक्ती शिल्पाशेजारील भूखंड हा शिवरायांच्या देदीप्यमान जीवन चरित्रावरील आधारित भव्यदिव्य शिवसृष्टी उभी करून जगातील सर्व पर्यटकांचे आकर्षण ठरावे व शिवजयंतीसाठी निगडी येथील पेठ क्रमांक २४ सब डिस्ट्रिक्ट सेंटरमधील सर्वे क्र. १२, १३, १४/३,१४/४,,१४/५ व १४/६ व्यापारी भूखंडाची जागा शिवसृष्टी मिळावी यासाठी भक्ती-शक्ती शिवजयंती उत्सव समितीने ११ पत्रव्यवहार सादर केले आहेत, असे निवेदनात म्हटले आहे. निवेदनावर जीवन बोराडे, सागर तापकीर, हेमंत शिंर्के, प्रवीण पाटील, प्रतीक इंगळे, अभिषेक म्हसे स सचिन ढोबळे यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.

समितीने दिलेले पत्र
- महापालिका आयुक्तांना १९ डिसेंबर २०२२
- महापालिका शहर अभियंत्यांना १ फेब्रुवारी २०२३
- पीएमआरडीए अध्यक्षांना २ फेब्रुवारी २०२३
- पीएमआरडीए आयुक्तांना २१ मार्च २०२३
- मुख्यमंत्री यांना २३ मार्च २०२३
- आमदार महेश लांडगे यांनी पीएमआरडीएला दिलेले २३ मार्च २०२३
- पीएमआरडीए आयुक्तांना मेलद्वारे २८ मार्च २०२३
- पीएमआरडीए आयुक्तांनी महापालिकेला रेडझोनबाबत केलेली विचारणा २१ जानेवारी २०२३
- पीएमआरडीए आयुक्तांनी राडारोडा हटविण्याकामी महापालिकेला २२ फेब्रुवारी २०२३
- जमीन व मालमत्ता विभागाने प्रसिद्ध केलेला रेडझोनचा नकाशा ८ मार्च २०२३

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com