पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना स्थानिकांचा विरोध
माण-म्हाळुंगे हायटेक सिटी ः मूळ विकास आराखडा कायम ठेवण्याची विरोध

पीएमआरडीएच्या अधिकाऱ्यांना स्थानिकांचा विरोध माण-म्हाळुंगे हायटेक सिटी ः मूळ विकास आराखडा कायम ठेवण्याची विरोध

पिंपरी, ता. २७ : माण-म्हाळुंगे हायटेक सिटीत पीएमआरडीए प्राधिकरणासाठी रहिवाशांनी काही जमिनी दिलेल्या आहेत. या ठिकाणी ‘पीएमआरडीए’चे काही अधिकारी रस्त्याचे चुकीचे रेखांकन करताना निदर्शनास आले. त्यामुळे स्थानिक रहिवाशांनी विरोध दर्शविला आहे.
माजी आयुक्त किरण गिते यांच्या उपस्थितीत चार वर्षांपूर्वी मोजणी करून मूळ प्रादेशिक विकास आराखड्यात (रिजनल प्लॅन) निश्चित केलेल्या हद्दी व त्यानंतर मार्किंग करीत असलेल्या हद्दीमध्ये मोठी तफावत आहे. ही तफावत सुमारे १०३ ते ११३ फूट आढळून आलेली आहे. त्यामुळे रस्त्याची अलाइनमेंट बदलली असून, रहिवासी आक्रमक झाले आहेत.
विकास आराखडा (डीपी) बनविताना जुना मूळ प्रादेशिक विकास आराखडा विचारात घेणे आवश्यक असते. रस्त्यासाठी जमीन संपादन करताना प्रादेशिक विकास आराखड्यामध्ये अस्तित्वात असलेल्या रस्त्यास कोणताही अडथळा नसेल तर, त्यावरच नवीन विकास आराखड्यामधील रस्ते करणे बंधनकारक असते. परंतु, प्रत्यक्ष जागेवर सूस व म्हाळुंगेमधील काही बांधकाम व्यावसायिक व लोकांचे हितसंबंध जोपासण्यासाठी सूस आणि माण- म्हाळुंगे हायटेक सिटीमधून जाणाऱ्या ३० मीटर रुंदीच्या रस्त्याचे आरेखन बदलल्याचे दिसून आले आहे, असे स्थानिक रहिवाशांचे म्हणणे आहे. त्यानुसार मूळ विकास आराखडा कायम ठेवावा, अशी मागणी काही नागरिकांनी ‘पीएमआरडीए’चे आयुक्त राहुल महिवाल यांना निवेदनाद्वारे केली आहे.

माण-म्हाळुंगे हायटेक सिटीसाठी प्रस्तावित मूळ प्रादेशिक विकास आराखड्याप्रमाणे ३० मीटर रुंदीच्या रस्त्याच्या ज्या हद्दी निश्चित केल्या होत्या. त्याच कायम ठेवाव्यात. नवीन टीपीएस माण-म्हाळुंगे योजनेला संलग्न असणाऱ्या रस्त्याचे चुकीचे नियोजन केले आहे. अलाइनमेंट बदलली आहे. त्यामुळे भविष्यात या ठिकाणी अपघाताचा धोका होऊ शकतो. लवादाच्या, नियोजन अधिकाऱ्यांना व आयुक्तांना भेटून आक्षेप नोंदवला आहे. चारही समिती सदस्यांची भेट घेतली आहे. सर्वांनी चूक झाल्याचे मान्य केले आहे. आराखडा व टीपीएस लवाद अधिकाऱ्यांमध्ये एकवाक्यता नाही. चालढकलीचे काम सुरू आहे.
- समीर गांधी, सामाजिक कार्यकर्ते, पुणे.
--
माण म्हाळुंगे टीपी स्कीम आणि प्रस्तावित आराखड्यात अलाइनमेंट जुळत नाही. आता संधी आहे की, विकास आराखड्यात बदल करून घेताना, ते दुरुस्त करता येईल.
- विवेक खरवडकर, महानगर नियोजनकार, पीएमआरडीए

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Esakal Marathi News
www.esakal.com