‘एस. बी. पाटील’मध्ये ‘युवोत्सव’ प्रारंभ विविध महाविद्यालयांमधून ७५ संघांचा सहभाग; उद्या समारोप | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘एस. बी. पाटील’मध्ये ‘युवोत्सव’ प्रारंभ

विविध महाविद्यालयांमधून ७५ संघांचा सहभाग; उद्या समारोप
‘एस. बी. पाटील’मध्ये ‘युवोत्सव’ प्रारंभ विविध महाविद्यालयांमधून ७५ संघांचा सहभाग; उद्या समारोप

‘एस. बी. पाटील’मध्ये ‘युवोत्सव’ प्रारंभ विविध महाविद्यालयांमधून ७५ संघांचा सहभाग; उद्या समारोप

sakal_logo
By

पिंपरी, ता. २७ ः पिंपरी-चिंचवड एज्युकेशन ट्रस्टच्या एस. बी. पाटील इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट विभाग व महापालिका यांच्यातर्फे आंतर महाविद्यालयीन ‘युवोत्सव २०२३’ या विविध क्रीडा स्पर्धा गुरुवारी सुरू झाल्या. फुटबॉल, बॉक्स क्रिकेट व टेबल टेनिस स्पर्धांनी प्रारंभ झाला. त्यात विविध महाविद्यालयांमधून ७५ संघांनी सहभाग घेतला आहे. शनिवारी (ता. २९) समारोप होईल.
महापालिका उपायुक्त विठ्ठल जोशी यांच्या हस्ते ‘युवोत्सवा’चे उद्‍घाटन झाले. महाराष्ट्र हॅण्डीकॅप टीमचे कोच व दिव्यांग क्रिकेट असोसिएशनचे सचिव राजू मुजावर, एसबीपीआयएमच्या संचालिका डॉ. कीर्ती धारवाडकर उपस्थित होते. जोशी म्हणाले, ‘‘शहराला क्रीडा क्षेत्रात राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जा मिळविण्यासाठी महापालिका प्रयत्नशील आहे. हॉकी व क्रिकेटचे राष्ट्रीय, आंतरराष्ट्रीय दर्जाचे मैदाने शहरात आहेत. आंतरराष्ट्रीय कुस्तीचे मैदान भोसरीत असून कबड्डीचे धडे दिले जाणार आहेत. ‘रोप-वे’ राष्ट्रीय संघात १४ खेळाडूंनी सहभाग नोंदविला आहे. बॅडमिंटन, आर्चरी, शुटिंग, हॉलीबॉल व मैदानी खेळांच्या सुविधा महापालिकेने दिल्या आहेत.’’
डॉ. धारवाडकर यांनी महाविद्यालयामार्फत राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची माहिती दिली. गेल्या सहा वर्षांपासून क्रीडा स्पर्धा घेण्यात येत असल्याचे त्यांनी सांगितले. स्पर्धेचे संयोजन डॉ. काजल माहेश्वरी, डॉ. अमरिश पद्मा, नंदलाल पारेख, विशाल निकम, अभिजित नायडू यांनी केले. ट्रस्टचे अध्यक्ष ज्ञानेश्वर लांडगे, उपाध्यक्षा पद्मा भोसले, सचिव विठ्ठल काळभोर, खजिनदार शांताराम गराडे, विश्वस्त हर्षवर्धन पाटील, कार्यकारी संचालक डॉ. गिरीश देसाई यांनी शुभेच्छा दिल्या.
---फोटो 39714