सराईत गुन्हेगाराचा शिवसेनेत प्रवेश | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

सराईत गुन्हेगाराचा 
शिवसेनेत प्रवेश
सराईत गुन्हेगाराचा शिवसेनेत प्रवेश

सराईत गुन्हेगाराचा शिवसेनेत प्रवेश

sakal_logo
By

पिंपरी, ता. २७ : खून, खुनाचा प्रयत्न, चोरी, लूटमार असे १८ गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल असलेल्या सराईत गुन्हेगाराने मोठा गाजावाजा करत शिवसेनेत प्रवेश केला. खासदार श्रीरंग बारणे यांनी त्याचा सत्कार करत, युवासेनेचे पद दिल्याने राजकीय वर्तुळात हा चर्चेचा विषय ठरला.
प्रशांत भानुदास दिघे (३१, रा. आराध्या सोसायटी, भुकूम) असे शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या सराईत गुन्हेगाराचे नाव आहे.
दरम्यान,पक्ष प्रवेशाचे छायाचित्र पाहून, प्रसार माध्यमांच्या प्रतिनिधींनी विचारणा केल्यानंतर शिवसेनेच्या पदाधिकऱ्यांनी हात झटकले. जिल्हाप्रमुख बाळासाहेब वाल्हेकर यांनी प्रसिद्धिपत्रक काढून प्रवेश स्थगित केला असल्याचे कळवले आहे. काळेवाडीतील काही प्रमुख कार्यकर्त्यांनी विनंती केल्यावरून दिघे याचा शिवसेनेत प्रवेश करून घेतला. त्याची पार्श्वभूमी माहिती नव्हती. मात्र, ती माहीत झाल्यावर त्याचा शिवसेना प्रवेश स्थगित केला आहे, असे वाल्हेकर यांनी प्रसिद्धिपत्रकात नमूद केले आहे.