मॉडर्न पूर्व प्राथमिकचा पदवीप्रदान समारंभ उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

मॉडर्न पूर्व प्राथमिकचा पदवीप्रदान समारंभ उत्साहात
मॉडर्न पूर्व प्राथमिकचा पदवीप्रदान समारंभ उत्साहात

मॉडर्न पूर्व प्राथमिकचा पदवीप्रदान समारंभ उत्साहात

sakal_logo
By

पिंपरी, ता.२९ ः यमुनानगर येथील मॉडर्न इंग्रजी माध्यमाच्या पूर्व प्राथमिक विभागाचा पदवी प्रदान समारंभ उत्साहात झाला. मीनल कुलकर्णी यांच्या हस्ते विद्यार्थ्यांना पदवी प्रमाणपत्र आणि गुणपत्रिका देण्यात आल्या. यावेळी व्यासपीठावर प्रमुख पाहुणे मीनल कुलकर्णी, शाळेचे पर्यवेक्षक डॉ. अतुल फाटक, मुख्याध्यापिका तृप्ती वंजारे, प्राथमिक विभागाचे मुख्याध्यापक पांडुरंग मराडे, हायस्कूलच्या मुख्याध्यापिका गौरी सावंत आदी उपस्थित होते. कार्यक्रमाची संकल्पना शाळा समितीचे अध्यक्ष यशवंत कुलकर्णी यांची होती. पालक संघाचे प्रतिनिधी उपस्थित होते. प्रास्ताविक आणि सूत्रसंचालन शीतल कोराड यांनी केले. मुलांचे स्वभाव वैशिष्ट्ये आणि गुणांविषयी माहिती रूपाली मिश्रा यांनी दिली. नमिता घोलप यांनी आभार मानले. संस्थेचे सचिव शामकांत देशमुख यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे व सहकार्यवाह प्रा. ज्योत्स्ना एकबोटे यांनी मुलांचे कौतुक केले.