पिंपरी-चिंचवड दर्शन बससेवा पूर्ववत सुरू

पिंपरी-चिंचवड दर्शन बससेवा पूर्ववत सुरू

पिंपरी, ता. २९ : शहरातील ऐतिहासिक, प्रेक्षणीय व धार्मिक स्थळांची नागरिक/पर्यटकांना सफर घडविण्यासाठी पीएमपीएमएलकडून वातानुकूलित पिंपरी-चिंचवड दर्शन बससेवा पूर्ववत सुरू करण्यात आली आहे.
पुणे महानगर परिवहन महामंडळाकडून ही बससेवा ३ ऑगस्ट २०२३ पासून सरू करण्यात आली होती. या बस सेवेकरिता प्रवासी, नागरिक, पर्यटकांचा प्रतिसाद मिळत नसल्याने तात्पुरत्या स्वरूपात बससेवा स्थगित ठेवण्यात आली होती. सध्या पर्यटकांची वाढती मागणी लक्षात घेता पुन्हा पिंपरी-चिंचवड दर्शन बससेवा १ मे २०२३ पासून दोन वातानुकूलित बसेसद्वारे पूर्ववत सुरू करण्यात येत आहे. निगडी (भक्ती-शक्ती) बसस्थानक येथून बससेवा सकाळी ९ वाजता सुरू होईल.
पिंपरी-चिंचवड दर्शन बससेवेमध्ये प्रतिप्रवासी रक्कम ५०० रुपये तिकीट दर आकारणी करण्यात येणार आहे. बसेसचे तिकीट वितरण निगडी, भोसरी व पिंपरी लोखंडे भवन येथील पास केंद्रावर उपलब्ध असणार आहेत. वेळेअभावी पर्यटन स्थळ/ठिकाण वगळले जाऊ शकते, याची प्रवाशांनी नोंद घ्यावी. बसची वेळ सकाळी ९ ते सायंकाळी ७:१५ अशी राहील. या बससेवेचा लाभ नागरिक, पर्यटकांनी घ्यावा, असे आवाहन महामंडळामार्फत करण्यात आले आहे.

ऐतिहासिक/प्रेक्षणीय स्थळांची नावे
भक्ती-शक्ती उद्यान (रनिंग), प्रतिशिर्डी शिरगाव, देहूगाव (मुख्य मंदिर), देहू गाथा मंदिर, बर्ड व्हॅली, सायन्स पार्क, चाफेकर बंधू स्मारक (रनिंग), मोरया गोसावी मंदिर मंगलमूर्ती वाडा, चाफेकर वाडा, इस्कॉन मंदिर, अप्पूघर/दुर्गा टेकडी.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com