
पालिकेकडून इन्कोव्हॅक लसीचे ३३६ डोस उपलब्ध
पिंपरी, ता. २९ : पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेस उपसंचालक, आरोग्य सेवा, कार्यालयाकडून कोविड १९ प्रतिबंधात्मक ‘इन्कोव्हॅक’ लसीचे ३३६ डोस प्राप्त झालेले आहेत. त्यानुसार महानगरपालिकेच्या निश्चित केलेल्या आठ लसीकरण केंद्रावर उपलब्ध लसीच्या साठ्यानुसार शासनाने निर्गमित केलेल्या सूचनांनुसार वय वर्षे ६० व पुढील नागरिकांना डोस मिळत आहेत.
इन्कोव्हॅक लसीचा प्रिकॉशन डोस नाकावाटे (ज्यांना कोविशिल्ड किंवा कोव्हॅक्सिन लसीच्या दुसऱ्या डोसनंतर ६ महिने किंवा २६ आठवड्याचा कालावधी पूर्ण झालेला आहे.) ऑन द स्पॉट रजिस्ट्रेशन इन कोविन अॅप या पद्धतीने महानगरपालिकेच्या कै. ह.भ.प. प्रभाकर मल्हारराव कुटे मेमोरीयल हॉस्पिटल आकुर्डी, क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले (जुने तालेरा) रुग्णालय चिंचवड, नवीन थेरगाव रुग्णालय थेरगाव, नवीन भोसरी रुग्णालय भोसरी, यमुनानगर रुग्णालय, नवीन जिजामाता रुग्णालय, अहिल्यादेवी होळकर सांगवी मनपा शाळा, कै. यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालय, कुटुंब कल्याण विभाग रूम नं. ६२ या लसीकरण केंद्रावर लसीकरण करण्यात येत आहे.