‘मन की बात’ची शहरात जय्यत तयारी | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

‘मन की बात’ची शहरात जय्यत तयारी
‘मन की बात’ची शहरात जय्यत तयारी

‘मन की बात’ची शहरात जय्यत तयारी

sakal_logo
By

पिंपरी, ता. २९ : पंतप्रधान नरेंद्र मोदी ‘मन की बात’ कार्यक्रमामध्ये रविवारी ३० एप्रिल रोजी सकाळी ११ वाजता देशवासीयांशी संवाद साधणार आहेत. या कार्यक्रमाच्या शंभराव्या भागाचे प्रसारण करण्यासाठी पिंपरी-चिंचवड भाजपच्यावतीने जय्यत तयारी करण्यात आली आहे.
भाजपचे शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे यांच्या मार्गदर्शनाखाली शहरातील सर्व प्रदेश पदाधिकारी, माजी नगरसेवक, जिल्हा पदाधिकारी, आघाडी अध्यक्ष व पदाधिकारी, मंडल अध्यक्ष व मंडल पदाधिकारी, मन की बात कार्यक्रमाचे संयोजक, सहसंयोजक, शक्तिकेंद्र प्रमुख, बूथ प्रमुख आणि कार्यकर्ते यांची ‘झूम’ बैठक घेण्यात आली. त्यामध्ये ‘मन की बात’ कार्यक्रमाच्या तयारीबाबत जबाबदारी आणि सूचना करण्यात आल्या.
यावेळी शहराध्यक्ष तथा आमदार महेश लांडगे, चिंचवडच्या आमदार अश्विनी जगताप, विधान परिषदेच्या आमदार उमा खापरे, मन की बात कार्यक्रमाचे पश्चिम महाराष्ट्र संयोजक अमित गोरखे, पिंपरी चिंचवड शहर संयोजक नंदकुमार दाभाडे यांच्यासह प्रमुख पदाधिकाऱ्यांनी मार्गदर्शन केले.
शहरातील सर्व शक्तीकेंद्रांवर लाईव्ह प्रसारणाची सुविधा केली आहे. नागरिकांना बसण्यासाठी आणि कार्यक्रम पाहण्यासाठी आवश्यक सुविधा देण्यात आल्या आहेत, अशी माहिती संयोजक नंदकुमार दाभाडे यांनी दिली.
--
‘‘पंतप्रधानांच्या ऐतिहासिक कार्यक्रमात पिंपरी-चिंचवडकरांनी सहभागी व्हावे. मन की बात कार्यक्रमात सहभागी होण्यासाठी www.Mygov.in या संकेतस्थळाला भेट द्या किंवा १८००११७८०० नंबर डायल करावा.
- महेश लांडगे, आमदार