महापालिका शाळेत ‘पहिलं पाऊल’ | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

महापालिका शाळेत 
‘पहिलं पाऊल’
महापालिका शाळेत ‘पहिलं पाऊल’

महापालिका शाळेत ‘पहिलं पाऊल’

sakal_logo
By

पिंपरी, ता. २९ : ‘निपुण महाराष्ट्र, निपुण भारत’ अंतर्गत शैक्षणिक वर्ष २०२२-२३ या वर्षात पहिल्या वर्गात प्रवेश घेणाऱ्या मुलांसाठी ‘पहिलं पाऊल’ हा उपक्रम सुरू झाला. सर्व महापालिकेच्या ११० शाळांमध्ये २८ व २९ एप्रिल रोजी शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात आले आहे. दोन टप्प्यात ‘पहिलं पाऊल’ उपक्रम पार पडणार आहे, अशी माहिती प्रशासन अधिकारी संजय नाईकडे यांनी दिली.
दुसरा टप्पा १५ जूनपासून सुरू होणार आहे. यामध्ये शिक्षक, पालक, माता लीडर, स्वयंसेवक यांचा सहभाग होता. आनंददायी शिक्षण, शारीरिक विकास, मानसिक विकास, भावनिक विकास, अजमावला जातो. सर्व दाखल पात्र विद्यार्थी शाळेत आणणे हा महत्वाचे हेतू या उपक्रमाचा आहे. जूनमध्ये शाळा सुरू होण्यापूर्वी शिक्षक पालकांच्या भेटी घेऊन, मुले घरी राहणार नाहीत, असे आवाहन करतील. प्रभातफेरी मिरवणूक काढून जनजागृती करतील, असे त्यांनी सांगितले.