
रोटरी क्लब एमआयडीसी तर्फे प्लास्टिक मुक्त तळेगाव उपक्रम
तळेगाव दाभाडे (स्टेशन), ता. १ : तळेगाव दाभाडे नगरपरिषद व रोटरी क्लब तळेगाव एमआयडीसी यांच्या संयुक्त विद्यमाने प्लास्टिक मुक्त तळेगाव दाभाडे शहर हा उपक्रम (ता.१) राबविण्यात आला. कार्यक्रमाची सुरुवात प्रमुख पाहुण्या श्री डोळसनाथ महाराज शिक्षण प्रसारक मंडळ संचलित स्वामी विवेकानंद इंग्लिश स्कूलच्या शालेय समिती अध्यक्षा रजनीगंधा खांडगे, मंजुश्री हदिमनी, मुख्याध्यापिका शमशाद शेख पर्यवेक्षिका रेणू शर्मा, प्राथमिक विभाग प्रमुख धनश्री पाटील यांच्या हस्ते दीपप्रज्वलन व प्रतिमा पूजनाने करण्यात आली. यावेळी तेजस्विनी सरोदे, शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, विद्यार्थी व पालक उपस्थित होते.
मुख्याध्यापिका शमशाद शेख यांनी प्रास्ताविक भाषणामध्ये पर्यावरणाचा होणारा ऱ्हास थांबवण्यासाठी या उपक्रमाचे आयोजन केले असल्याचे सांगितले. रजनीगंधा खांडगे म्हणाल्या, ‘‘प्लास्टिकच्या वापराने निसर्गाची तसेच मानवाची अपरिमित हानी होत आहे. त्यामुळे प्लास्टिक मुक्त तळेगाव दाभाडे करण्यासाठी कापडी पिशवीचा वापर करू असा निर्धार करून तशी शपथ घेतली. विद्यार्थ्यांना कापडी पिशवीचे वाटप करण्यात आले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्रदर्शन शिक्षिका जयश्री गायकवाड, सुजाता गुंजाळ यांनी केले.