अभिवादन, सन्मान अन् बक्षिस वितरण | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

अभिवादन, सन्मान अन् बक्षिस वितरण
अभिवादन, सन्मान अन् बक्षिस वितरण

अभिवादन, सन्मान अन् बक्षिस वितरण

sakal_logo
By

पिंपरी, ता. २ ः पिंपरी चिंचवड शहरात विविध राजकीय पक्ष, संस्था आणि संघटना यांच्यावतीने वेगवेगळ्या उपक्रमांनी महाराष्ट्र दिन व जागतिक कामगार दिन साजरा करण्यात आला.


‘माझी वसुंधरा अभियान ३.०’ स्पर्धेतील विजेत्यांना बक्षीस वाटप
महापालिकेच्यावतीने पिंपरी येथील मुख्य प्रशासकीय इमारतीच्या प्रांगणात प्रशासक शेखर सिंह यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील, जितेंद्र वाघ, उल्हास जगताप, शहर अभियंता मकरंद निकम, मुख्य लेखापरीक्षक प्रमोद भोसले, मुख्य लेखा व वित्त अधिकारी जितेंद्र कोळंबे, सह शहर अभियंता रामदास तांबे, उपआयुक्त विठ्ठल जोशी, रवीकिरण घोडके, मनोज लोणकर, संदीप खोत उपस्थित होते. ‘माझी वसुंधरा अभियान ३.०’ अंतर्गत महाविद्यालयांमध्ये घेण्यात आलेल्या स्पर्धेतील विजेत्यांना यावेळी बक्षीस वाटर करण्यात आले. प्रथम क्रमांकाचे रोख रक्कम ४१ हजाराचे बक्षीस पिंपरी-चिंचवड कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग, निगडी यांच्या वतीने प्राचार्य डॉ. गोविंद कुलकर्णी यांनी स्वीकारले. तर द्वितीय क्रमांकाचे रोख रक्कम ३१ हजाराचे बक्षीस प्रतिभा कॉलेज ऑफ एज्युकेशन, चिंचवड यांनी पटकावले. नावीन्यपूर्ण तंत्रज्ञान स्पर्धेतील विजेत्यांचा देखील सत्कार करण्यात आला. प्रथम क्रमांक विजेते रणजित शानबाग यांना ४१ हजार रुपये, द्वितीय बक्षिस विजेते अरुण दिक्षित यांना ३१ हजार तर तृतीय क्रमांक विजेते शरद संकपाळ आणि पंकज इंगळे यांना बक्षीस विभागून देण्यात आले. सर्व विजेत्यांना सन्मानपत्र देऊन सन्मानित केले.

कामगार चळवळीतील नेत्यांच्या आठवणींना उजाळा
महाराष्ट्र मजदूर संघटनेच्यावतीने चिंचवडच्या केएसबी चौकात कामगार भूषण स्व. अण्णासाहेब पाटील यांच्या पुतळ्यास कामगार नेते इरफान सय्यद यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. यावेळी वाहनफेरी, मेळा‌वे आदी कार्यक्रम घेतले. उपस्थित कामगार संघटनांच्या प्रतिनिधींनी कामगार चळवळीतील नेत्यांच्या आठवणींना उजाळा दिला. कार्यक्रमास महाराष्ट्र मजदूर संघटनेचे कार्याध्यक्ष परेश मोरे, भिवाजी वाटेकर, प्रवीण जाधव पांडुरंग कदम,पांडुरंग काळोखे, अप्पा कौदरे, सर्जेराव कचरे, सतीश कंठाळे, श्रीकांत मोरे, नागेश व्हनवटे, अशोक साळुंखे, शंकर मदने, बबन काळे आदी उपस्थित होते.


सफाई व सुरक्षा कर्मचाऱ्यांचा सन्मान
रयत विद्यार्थी विचार मंच संस्थेच्या वतीने महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त सफाई व सुरक्षा कर्मचारी कामगारांना मिठाई वाटप करत सन्मान केला. एच. ए. मधील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याला व भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पिंपरीतील पुतळ्याला संस्थापक अध्यक्ष धम्मराज साळवे , पोलिस उपनिरीक्षक गुळीग साहेब, नीलेश पवार, तृतीयपंथी सुरक्षा रक्षक सिद्धी कुंभार यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. यावेळी प्रदेश महासचिव संतोष शिंदे, सदस्य नीलेश आठवले, संघटक अजय चक्रनारायण, सहसचिव सचिन सूर्यवंशी तसेच रामा तृतीयपंथी दक्षता सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष/खजिनदार नीलेश पवार, सचिव सिद्धी कुंभार, उपाध्यक्ष रितिका परमार, सहसचिव आरोही राठोड, सदस्य रोहिणी मोरे उपस्थित होते.

दिघी मॅक्झिन सेवा केंद्राद्वारे रक्तदान शिबिर
महाराष्ट्र दिन, कामगार दिनाचे औचित्य साधत श्री स्वामी समर्थ दिंडोरी प्रणीत सेवा मार्गाद्वारे सद्‍गुरू परमपूज्य मोरेदादा यांच्या पुण्यतिथीनिमित्त व आमदार महेश लांडगे यांच्या मातोश्री कै. सौ. हिराबाई किसनराव लांडगे यांच्या स्मृती प्रित्यर्थ दिघी मॅक्झिन सेवा केंद्राद्वारे रक्तदान शिबिर घेतले. शिबिरामध्ये सुमारे १५० हून अधिक रक्तदात्यांनी रक्तदान सेवा केली. तसेच, यशवंतराव चव्हाण स्मृती रुग्णालयातील रक्तपेढीने सहकार्य केले. यावेळी उद्योजक कार्तिक लांडगे, सचिन लांडगे, मुकेश लोंढे, कानिफनाथ मंदिर चऱ्होली अध्यक्ष अॅड जालिंदर जोरे, संतोष तापकीर, श्री स्वामी समर्थ सेवा केंद्राचे मनोज काळे, आनंद फुले, श्रीनिवास साखरे, शिवाजी पवार, रोहित तापकीर, अमोल शिंदे, अनिल शिंदे, राजकुमार जाधव, शंकर पाटील, सागर वायकर, दादासाहेब साळुंखे, समाधान शिर्के, विजय भोसले, मुकुंदराज पाटील, शिरीष वाघुंडे, विलास हिवाळे, नवनाथ आरुडे, विलास केंद्रे, प्रशांत खलाणे, उदय फुलारी आदी उपस्थित होते.

खराळवाडीत गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजवंदन
राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कार्यालय, खराळवाडी येथे महाराष्ट्र दिन व कामगार दिनानिमित्त शहराध्यक्ष अजित गव्हाणे यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आले. मुख्य संघटक अरुण बोऱ्हाडे यांनी कामगार दिनाची माहिती देऊन सर्वांना मार्गदर्शन केले. यावेळी महिला अध्यक्ष कविता आल्हाट, युवक अध्यक्ष इम्रान शेख, चिंचवड विधानसभा संघटक सतीश दरेकर, युवती अध्यक्ष वर्षा जगताप, ओबीसी सेल अध्यक्ष विजय लोखंडे, सेवादल सेल अध्यक्ष महेश झपके, सामाजिक न्याय विभाग अध्यक्ष संजय औसरमल, व्यवस्थापन सेल अध्यक्ष अकबर मुल्ला, कामगार सेल अध्यक्ष किरण देशमुख, महिला वरिष्ठ कार्याध्यक्ष कविता खराडे, अर्बन सेल अध्यक्ष दत्तात्रेय जगताप, अर्बन सेल महिला अध्यक्ष मनीषा गटकळ, ओबीसी प्रदेश उपाध्यक्ष सचिन औटे, उद्योग व्यापार सेल अध्यक्ष विजयकुमार पिरंगुटे, युवक प्रदेश सरचिटणीस प्रशांत सपकाळ उपस्थित होते.

संयुक्त महाराष्ट्रात चळवळीत सहभागी हुतात्म्यांना अभिवादन
भोसरी एमआयडीसी येथे फोरम ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशन व हिंदुस्तान माथाडी ट्रान्स्पोर्ट व जनरल कामगार सेनेतर्फे कामगार बंधूंचा आणि भगिनींचा सन्मान करण्यात आला. भोसरी एमआयडीसीचे वरिष्ठ पोलिस निरीक्षक राजेंद्र निकाळजे यांच्या हस्ते संयुक्त महाराष्ट्रात चळवळीत सहभागी हुतात्म्यांना अभिवादन करण्यात आले. भोसरी एमआयडीसी याबद्दल संपर्क कार्यालय येथे अध्यक्ष अभय भोर उपस्थित होते. निकाळजे यांच्या हस्ते गुलाब पुष्प देऊन कर्मचाऱ्यांचा सन्मान करण्यात आला.


डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन
रिपब्लिकन जनशक्ती पक्षाच्यावतीने पिंपरी येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास पक्षाचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष शैलेंद्र मोरे यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण केला. पक्षाचे शहराध्यक्ष माऊली भोसले यांच्या हस्ते उपस्थित कामगारांचा गुलाब पुष्प आणि श्रीफळ देवून सन्मान करण्यात आला. यावेळी तिफन्ना ताई काळे, ऋषिकेश भोसले, दादाराव कांबळे, पेशल काळे, दीपाली भोसले, किरन काळे, अनिल पवार, मीनाताई मगर, रुक्मिणी कांबळे, यांच्यासह कार्यकर्ते व विविध क्षेत्रातील असंघटित कामगार उपस्थित होते. सत्कार समारंभानंतर शहर उपाध्यक्ष ऋषिकेश भोसले यांनी आभार मानले.

जोगदंड यांच्या हस्ते ध्वजवंदन
महाराष्ट्र दिन व कामगार दिनाचे औचित्य साधून भारतीय जैन संघटना माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयात राज्य शासनाचे गुणवंत कामगार पुरस्कार विजेते अण्णा जोगदंड यांच्या हस्ते ध्वजवंदन केले. जोगदंड यांनी आपल्या भाषणातून कामगारांच्या समस्या व सध्याची परिस्थिती याचा आढावा घेतला. याप्रसंगी प्राचार्य दिलीपकुमार देशमुख, उपप्राचार्य डॉ. राजेंद्र कोकणे, प्राथमिकचे मुख्याध्यापक संजय जाधव उपस्थित होते. कामगार दिनानिमित्त भारतीय जैन संघटनेच्या माध्यमिक विद्यालयातील एनएमएमएस परीक्षेत गुणवता यादीत आलेल्या अनुष्का गोरडे, वैभव सचिन मेंगडे, भाग्यश्री हरळय्या या दोन विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणारे शिक्षक अविनाश यादवाडकर, सुनीता पांडकर, संतोष नाईकनवरे, मयूर मरळ यांचाही सन्मान करण्यात आला. नियोजन निवेदिता धायबर, विजया बोदडे यांनी केले. प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा. संपत गर्जे यांनी केले तर आभार डॉ. राजेंद्र कोकणे यांनी मानले.