ॲन्थिया ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन उत्साहात | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

ॲन्थिया ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन उत्साहात
ॲन्थिया ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन उत्साहात

ॲन्थिया ज्येष्ठ नागरिक संघाचा वर्धापन दिन उत्साहात

sakal_logo
By

पिंपरी, ता. ३ : खराळवाडीतील ॲन्थिया ज्येष्ठ नागरिक संघाचा दुसरा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. या प्रसंगी पिंपरी-चिंचवड ज्येष्ठ नागरिक महासंघाच्या अध्यक्षा वृषाली मरळ, सरचिटणीस बाबुराव फुले, उपाध्यक्षा सुनीता कोकाटे, तसेच सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद आपटे व सचिव सागर किल्लेकर उपस्थित होते.
संघाचे वर्षात होणारे वेगवेगळे उपक्रम व माहिती सांगितली. वृषाली मरळ महासंघाच्या उपाध्यक्षा यांनी ज्येष्ठ नागरिक संघाची आवश्यकता व त्या संबंधित माहिती सांगितली. अँथिया ज्येष्ठ नागरिक संघाला सर्व प्रकारची मदत केली जाईल असे आश्वासन सोसायटीचे अध्यक्ष मिलिंद आपटे यांनी दिले. पुरुष व महिला सभासदांच्या विविध खेळांच्या स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते. विजेत्यांचा ट्रॉफी देऊन सत्कार करण्यात आला. सभासदांनी नृत्य व गाणी मनोरंजनाचा कार्यक्रम सादर केला. त्यानंतर शरद चव्हाण व श्रद्धा कांबळे यांनी संगीत सफर हा आर्केस्ट्रा सादर केला. अध्यक्ष नंदकुमार कुंभार यांनी प्रास्ताविक केले. शिरीषकुमार पाठक यांनी सूत्रसंचालन केले. उपाध्यक्ष सुधाकर पाठक यांनी आभार मानले.