सुरेल मैफलीने वसंत व्याख्यानमालेचा समारोप

सुरेल मैफलीने वसंत व्याख्यानमालेचा समारोप

पिंपरी, ता. ३ ः निगडीतील मॉडर्न शैक्षणिक संकुल आयोजित वसंत व्याख्यानमालेच्या समारोप जितेंद्र भुरुक प्रस्तुत ‘लता किशोर आशा एक सुरेली सफर’ या संगीतमय कार्यक्रमाने झाला. त्यास उपस्थित श्रोत्यांचा उत्तम प्रतिसाद मिळाला.
व्यासपीठावर संस्थेचे कार्याध्यक्ष डॉ. गजानन एकबोटे, बाबासाहेब चव्हाण, प्रा. श्यामकांत देशमुख, डॉ. ज्योत्स्ना एकबोटे, उपकार्यवाह चित्तरंजन कांबळे, डॉ. निवेदिता एकबोटे, दीपक मराठे, आमदार उमा खापरे, सुमन पवळे, सुलभा उबाळे, डॉ. प्रकाश दीक्षित, प्राचार्य, डॉ. संजय खरात, डॉ. मिलिंद आळंदीकर, मृगजा कुलकर्णी, उद्धव खरे, राजीव कुटे, प्रा. योगेश ठिपसे, प्रमोद शिंदे, मोनिका वैद्य, दत्तात्रेय पाटोळे, राजन देवकाते, दादाभाऊ शिनलकर, सतीश लिंभेकर, गणपत नांगरे उपस्थित होते.
याप्रसंगी आमदार खापरे व जितेंद्र भुरुक यांचा संस्थेतर्फे सत्कार करण्यात आला. गायक भुरुक यांनी ‘झूम झूम झुमरू, ओ हंसिनी, आने वाला पल, पाच रुपय्या बारा आणा, हाल कैसा है जनाब का, तेरे बीना जिंदगी से, गाता रहे मेरा दिल, तुम आ गये हो, मेरे मेहबूब, परदेशीया , मच गया शोर, देखा ना हायरे, ’ अशी गाणी सादर केले. सादर केलेल्या गीतांना श्रोत्यांनी भरभरून दिली. प्रसिद्ध सोबत सहगायिका अश्विनी कुरपे, दृष्टी बालानी व नमिता यांनी उत्तम साथ दिली. त्यांना तबला ढोलकी रोहित साने, ड्रम वर अभिषेक भुरुक, बासरी सचिन वाघमारे, गिटार वर रेणू व हार्दिक रावळ, सेक्सोफोनवर बाबा खान तर सिंथेसायझरवर रशीद शेख यांनी साथ दिली. दृक-श्राव्य सादरीकरणासाठी प्रा. समीर नेर्लेकर यांनी नियोजन केले.
प्रसिद्ध निवेदिका, प्राजक्ता मांडके यांनी या सुरेल सफरीचे सूत्रसंचालन केले. परिचय अश्विनी भरगुडे यांनी करून दिला. सूत्रसंचालन आशा कुंजीर यांनी केले. आभार ज्ञाती चौधरी यांनी मानले.
संयोजन मुख्याध्यापक प्रकाश पाबळे, पांडुरंग मराडे, मुख्याध्यापिका गौरी सावंत, तृप्ती वंजारे, संगीता घुले, प्राचार्य डॉ. प्रवीण चौधरी, डॉ. शशिकांत ढोले, डॉ. अरुणा देऊस्कर, डॉ. सदाशिव शिरगावे, डॉ. मैथिली अर्जुनवाडकर, डॉ.अतुल फाटक, नरेंद्र चौधरी व सुजाता बलकवडे यांनी केले.

PNE23T40557

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com