गुन्हे वृत्त

गुन्हे वृत्त

चिंचवडमधून मोटार चोरीला
पिंपरी : वाल्हेकरवाडी, चिंचवड येथे पार्क केलेली स्विफ्ट मोटार अज्ञातांनी चोरून नेली. ही घटना २८ ते ३० एप्रिल या कालावधीत घडली. धनंजय बाबूराव गुळूंजकर (वय ४६) यांनी याप्रकरणी चिंचवड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. त्यानुसार अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांनी त्यांची दोन लाख रुपये किमतीची कार राहत्या घराजवळ पार्क केली होती. चिंचवड पोलिस तपास करीत आहेत.

कार्यालयामधून एक लाखांची रोकड लंपास
सुतारवाडी, पाषाण येथे एक ऑफिस फोडून चोरट्यांनी एक लाख १४ हजार ५९४ रुपये रोख रक्कम चोरून नेली. ही घटना उघडकीस आली. संकेत काशिनाथ मालुसरे (वय ३४, रा. वारजे) यांनी याप्रकरणी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. अज्ञाताच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. फिर्यादी यांचे कार्यालय रविवारी रात्री अकरा ते सोमवारी सकाळी सहाच्या कालावधीत कुलूप लावून बंद होते. अज्ञातांनी ऑफिसचे कुलूप तोडून लॉकरमधून एक लाख १४ हजार ५९४ रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरून नेली. अधिक तपास हिंजवडी पोलिस करीत आहेत.

पोलिसात तक्रार दिल्याने शिवीगाळ
पोलिसात तक्रार दिल्याच्या रागातून महिलेला शिवीगाळ करण्यात आली आहे. हा प्रकार देहूरोड येथे घडला. या प्रकरणी महिलेने देहूरोड पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. दोन महिलांच्या विरोधात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादींनी आरोपी महिलांच्या विरोधात पोलिसात तक्रार दिली होती. पोलिस पंचनामा करण्यासाठी आरोपींच्या घराजवळ आले. पंचनामा करून गेल्यानंतर दोन्ही आरोपी महिलांनी फिर्यादी यांना शिवीगाळ केली. तक्रार मागे न घेतल्यास फिर्यादी यांच्या वडील आणि भावावर खोटे गुन्हे दाखल करण्याची धमकी देत शिवीगाळ केल्याचे फिर्यादीत नमूद केले आहे. देहूरोड पोलिस तपास करीत आहेत.

साहित्य चोरून नेताना पकडले
बांधकामाचे साहित्य चोरून नेत असताना नागरिकांनी दोघांना रंगेहाथ पकडले. हा प्रकार विप्रो सर्कल, हिंजवडी येथे घडला. सुनील दिलीप कदम (वय ३३, रा. मारुंजी), राम सुभाष मेणे (वय ३२, रा. कासारसाई) अशी अटक केलेल्या आरोपींची नावे आहेत. याप्रकरणी अविनाश दादासाहेब नरोळे (वय २८, रा. जुनी सांगवी) यांनी हिंजवडी पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. हिंजवडी पोलिस तपास करीत आहेत.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com